पुणे | कुख्यात गुंड गजानन मारणे नुकताच तळोजा कारागृहातून 2 खुनाच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता झाली आहे. सोमवारी संध्याकाळी गजानन मारणे याची तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर त्याच्या स्वागतासाठी शेकडो गाड्या आणि हजारो समर्थक जमले होते.
गुंडांच्या सुटकेवरून जर असा जल्लोष होणार असेल तर, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे, तळोजा ते पुण्यापर्यंत शेकडो गाड्यांनी राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करून 1 रुपयाही टोल भरला नाही. त्यामुळे, गुंडांना महाराष्ट्रात टोल माफी झाली का? असा प्रश्न जनसामान्यातून विचारला जात आहे.
2014 मधील पप्पू गावडे आणि अमोल बधे खून प्रकरणात गजानन मारणे आणि त्याच्या समर्थकांवर मोक्का लावण्यात आला होता आणि सगळ्यांना पुण्याच्या येरवडा कारागृहात ठेवण्यात आलं होतं. त्या खटल्यातून आता त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली असल्याने मोठ्या धडाक्यात गजानन मारणेचं पुण्यात स्वागत करण्यात आलं.
दरम्यान, मारणेच्या समर्थकांनी उर्से टोल नाक्यावर फटाके वाजवून दहशतीचं वातावरण निर्माण केल्याप्रकरणी तळेगाव दाभाडे येथे गुन्हा दाखल झाला आहे. या सर्व प्रकरणाची गृहराज्य मंत्री शंभुराजे देसाई यांनी दखल घेतली असून झालेला प्रकार अत्यंत गंभीर असून याबाबत आयुक्तांशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
पाहा व्हिडीओ-
थोडक्यात बातम्या –
भेटी लागे जिवा… विठुराया आणि भक्ताच्या ‘या’ भेटीनं साऱ्यांचे डोळे पाणावले!
गुंड गजानन मारणेची तुरुंगातून सुटका, 500 गाड्या स्वागताला; पाहा 5 व्हायरल व्हिडीओ-
आयपीएलच्या लिलावाआधी मोठी घोषणा, ‘या’ सघानं घेतला नाव बदलण्याचा निर्णय!
रस्ते वाहतूक मंत्रालयाची मोठी घोषणा, ‘त्या’ वाहनचालकांना आता थेट मिळणार वाहन परवाना!
ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘जिवेत् शरद: शतम् योजना’; नेमकी काय आहे ही योजना???