पुणेकरांसाठी अभिमानाची बाब! गुन्हे शाखेच्या पोलीस आयुक्तांना मिळणार विशिष्ट सेवा पोलीस पदक

Gallantry Medal

Gallantry Medal l भारताच्या स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधत केंद्र सरकारने सेवा पदकांची घोषणा केली आहे. यामध्ये पोलीस, अग्निशमन दल, गृहरक्षक दल आणि नागरी संरक्षण आणि सुधारात्मक सेवांचे एकूण 1037 कर्मचारी शौर्य आणि सेवा पदकासाठी निवडले गेले आहेत. गृह मंत्रालयाने आज स्वातंत्र्य दिनानिमित्त विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक/मेरिटोरिअस सेवेसाठी पदक प्राप्तकर्त्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. या सर्वांना उद्या म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

पुण्याचे पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांना विशिष्ट सेवा पोलीस पदक जाहीर :

पुणे पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या सेवेत असणारे पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांना देखील राष्ट्रपती विशिष्ट सेवा पोलीस पदक जाहीर करण्यात आलं आहे. त्यांनी अनेक मोठ्या गुन्ह्यांची प्रकरणं हाताळत पोलीस दलात महत्त्वाचं योगदान दिलं आहे. याशिवाय अतिरिक्त पोलीस महासंचालक चिरंजीव प्रसाद आणि संचालक राजेंद्र डहाळे यांना देखील राष्ट्रपती विशिष्ट सेवा पोलीस पदक जाहीर झालं आहे.

यामध्ये पोलीस सेवेला 208, अग्निशमन सेवेला 4, होमगार्ड आणि सिव्हिल डिफेन्सला 1 पदके देण्यात येणार आहेत. 25 जुलै 2022 रोजी झालेल्या दरोड्यात दुर्मिळ शौर्य दाखविल्याबद्दल तेलंगणा पोलिसांचे हेड कॉन्स्टेबल चडुवु यदाय्या यांना राष्ट्रपती पदक (PMG) प्रदान करण्यात येणार आहे.

Gallantry Medal l हे पदक कोणाला मिळते? :

विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक (PSM) सेवेतील विशिष्ट विक्रमासाठी प्रदान केले जाते आणि गुणवत्तेसाठी पदक (MSM) साधनसंपत्ती आणि कर्तव्याची निष्ठा द्वारे वैशिष्ट्यीकृत मौल्यवान सेवेसाठी प्रदान केले जाते. तसेच शौर्य पुरस्कार वर्षातून दोनदा दिले जातात.

प्रत्येक वेळी या पदकासाठी वेगवेगळे कर्मचारी निवडले जातात. हे पदक पहिल्यांदा 26 जानेवारीला म्हणजेच प्रजासत्ताक दिनाला आणि दुसऱ्यांदा 15 ऑगस्टला म्हणजेच स्वातंत्र्यदिनाला दिले जाते. यातील काही पुरस्कार फक्त सैनिकांना, तर काही पुरस्कार पोलीस, तुरुंगातील कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिकांना दिले जातात.

News Title : Gallantry and Service Medals 2024

महत्वाच्या बातम्या-

राज्यातील पावसासंदर्भात काय आहे हवामान विभागाचा अंदाज!

सावधान! भारतातील मीठ आणि साखरेच्या अनेक ब्रँड्समध्ये आढळला ‘हा’ घातक पदार्थ

घटस्फोटानंतर हार्दिक पांड्या ब्रिटिश गायिकेला करतोय डेट?, फोटो झाले व्हायरल

भाविकांनो पुण्यातील ‘हे’ सर्वात मोठं मंदिर एक महिना बंद राहणार!

प्रफुल पटेलांना पराभवाची धूळ चारणारा ‘हा’ बडा नेता कॉँग्रेसच्या वाटेवर; भाजपला ठोकला रामराम

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .