बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“घरात घुसून मारू म्हणत सत्तेत आलेली व्यक्ती म्हणते, घरात कुणी घुसलंच नाही”

नवी दिल्ली | गलवान खोऱ्यात झालेल्या लष्करी संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले. यानंतर केंद्र सरकारवर टीकेचे बाण सोडले जात असून, जेएनयूतील माजी विद्यार्थी नेता कन्हैया कुमारनंही याच मुद्यावरून सरकारला लक्ष्य केलं आहे.

पंतप्रधान मोदी यांनी चिनी सैन्यानं भारताच्या भूभागात घुसखोरी केली नव्हती, असा दावा मोदी यांनी केला होता. पंतप्रधानांनी केलेल्या दाव्यानंतर जेएनयूतील विद्यार्थी नेता कन्हैया कुमारनं सरकारवर टीकेची तोफ डागली आहे.

घरात घुसून मारू असं म्हणत सत्तेत आलेली व्यक्ती आपले 20 जवान शहीद झाल्यानंतर म्हणतेय की घरात कुणी घुसलंच नाही, असं ट्विट करत कन्हैयानं पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधलाय.

देशाकडे कुणीही वाकड्या नजरेने पाहू शकत नाही. चीनकडून सीमेवर कोणत्याही प्रकारची घुसखोरी झाली नसून चीनला उत्तर देण्यास भारतीय लष्कर सक्षम आहे, असं मोदी म्हणाले आहेत.

 

ट्रेंडिंग  बातम्या-

…म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र, पत्रात केले ‘हे’ आरोप

सुशांतसिंगच्या मृत्यूनंतर आता अभय देओलचा धक्कादायक खुलासा

महत्वाच्या बातम्या-

“…तेव्हा फडणवीसांच्या बंगल्यात थांबून थोरात काय करत होते?”

चीन भारतावर सायबर हल्ला करण्याच्या तयारीत, अशी करा स्वतःची सुरक्षा!

PM नरेंद्र मोदींच्या हस्ते गरीब कल्याण योजनेचा शुभारंभ; ‘या’ लोकांना मिळणार फायदा!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More