बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नियतीचा खेळ! सासऱ्याचा मृतदेह नेत होता जावई अन्…, एकाच दिवशी माय-लेकी झाल्या विधवा

चंद्रपूर | चंद्रपूर येथे मनाला सुन्न करणारी घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीच्या सासऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर जावई आपल्या सासऱ्याचा मृतदेह घेऊन शवविच्छेदनासाठी नेत असतानाचा काळाने घाला घातला. यामुळे आई आणि लेक एकाच दिवशी विधवा झाल्याची दुःखद घटना समोर आली आहे.

संबंधित मृत झालेल्या सासऱ्यांचं नाव किसन चिंडम असं असून शेतावर काम करत असताना हिरापूर येथे त्यांचा अचानक मृत्यू झाला. मृत किसन चिंडम यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला होता. नातेवाईकांनी गावातील एक पिकअप वाहन भाड्यानं घेऊन किसन यांचा मृतदेह चिमूर याठिकाणी घेऊन जात होते.

यादरम्यान, चिमूर कानपा महामार्गावरून जात असताना शंकरपूर याठिकाणी त्यांच्या वाहनाला एका अज्ञात ट्रकनं जोरदार धडक दिली. या अपघातात चालकासह वाहनातील सहा नातेवाईक गंभीर जखमी झाले. स्थानिक लोकांनी हा अपघात पाहताच तातडीने सर्वांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र रविवारी पहाटे चारच्या सुमारास जावई शंकर गोमा खंडाते यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दरम्यान, वाहनातील अन्य जखमी रुग्णांना रविवारी सकाळी पुढील उपचारासाठी चंद्रपूर याठिकाणी हलवण्यात आलं आहे. एकाच दिवशी सासरे आणि जावयाचा मृत्यू झाल्यानं गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर अपघातामुळे मायलेकीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

थोडक्यात बातम्या-

सरकारला धारेवर धरल्याशिवाय आम्ही राहणार नाही- प्रविण दरेकर

कोणतीही धक्काबुक्की झालेली नाही, आम्ही त्यांना पुरुन उरलो- देवेंद्र फडणवीस

वारीला बंदी हे द्रौपदीच्या पदराला हात घालण्याचं पाप- संभाजी भिडे

‘…म्हणून मी मुख्यमंत्र्यांना ते पत्रं लिहिलं’; प्रताप सरनाईकांचा खुलासा

मोदी पेट्रोलच्या किंमती कमी करण्यासाठी नाहीतर भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी आलेत- भाजप

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More