बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुनित राजकुमारचा शेवटचा चित्रपट ‘या’ तारखेला प्रदर्शित होणार, पोस्टर पाहून चाहते भावूक

चेन्नई | दक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता पुनित राजकुमारचं (Puneeth Rajkumar) मागील वर्षी धक्कादायक निधन झालं. ह्रदय विकाराच्या झटक्याने वयाच्या 46 व्या वर्षी त्याने जगाला अलविदा केला. त्याच्या जाण्याने चाहत्यांनी आणि एकंदरीत चित्रपट जगताने हळहळ व्यक्त केली. निधनापूर्वी पुनित राजकुमारने एक चित्रपट केला होता आणि तो प्रदर्शित होण्यापूर्वी त्यांना देवाज्ञा झाली.

आता त्यांच्या पत्नी अश्र्विनी पुनित कुमार (Ashwini Puneeth Rajkumar) यांनी ट्विटर आणि इतर समाज माध्यमांवर एक पोस्ट टाकत त्यांच्या नव्या चित्रपटाच्या “गंधा गुडी” (Gandha Gudi) च्या प्रदर्शनाबाबत माहिती दिली. पुनित राजकुमार यांचा हा चित्रपट त्यांच्या पुण्यतिथीच्या एक दिवस अगोदर प्रदर्शित होणार आहे.

अश्र्विनी पुनित कुमार यांनी चित्रपटाचे पोस्टर टाकत लिहिले की, अप्पूचा शेवटचा चित्रपट, ज्यात तो स्वत: कर्नाटकाचे सुंदर जग दाखविणार आहे. त्याच्या चाहत्यांनी त्याच्यावर खूप प्रेम केले, त्यासाठी त्याच्या चाहत्यांंसाठी ही प्रेमपुर्ण भेट. हा चित्रपट येत्या 28 ऑक्टोबरला सर्वत्र चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे.

दरम्यान, या चित्रपटाची निर्मिती अश्र्विनी पुनित कुमार यांनी केले आहे. “गंधा गुडी” हा एक काल्पनिक नसलेला चित्रपट आहे. पुनित कुमारने 2002 मध्ये अप्पू या चित्रपटात काम केले होते. तेव्हापासून ते अप्पू म्हणून ओळखले जाऊ लागले.

 

थोडक्यात बातम्या – 

जगदीप धनखड यांना उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी देण्यामागे भाजपची ‘ही’ मोठी खेळी?

सुष्मितासोबतच्या नात्याची कबूली दिल्यानंतर ललित मोदी ‘या’ कारणामुळे माध्यमांवर संतापले, म्हणाले..

‘हे बरोबर नाही’, कतरिनाच्या वाढदिवशी नेटकरी विकीवर संतापले

मुख्यमंत्रीपदासाठी बाशिंग बांधून बसलेले नवज्योतसिंग सिद्धू तुरुंगात क्लार्क, दलेर मेंहदीही साथीला

संजय राऊतांनी गजनी सिनेमा पहावा, आशिष शेलारांचा खोचक सल्ला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More