बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तामिळनाडूच्या मंत्रिमंडळात गांधी आणि नेहरू घेणार मंत्रिपदाची शपथ

चेन्नई | तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचा निकाल नुकताच लागला असून डीएमके पक्षाच्या पारड्यात जनतेचा कौल पाहायला मिळाला. 234 विधानसभा मतदारसंघांपैकी 133 मतदारसंघांमध्ये डीएमके पक्षाने विजय प्राप्त केला. डीएमके पक्षाचे प्रमुख एम.के स्टॅलिन यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

स्टॅलिन यांनी मंत्रिपदाची शपथ घेण्याअगोदर 34 कॅबिनेट मंत्र्यांची यादी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याकडे सादर केली होती. राज्यपालांनी गुरुवारी ही यादी स्वीकारली आणि आज एम.के स्टॅलिन हे तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. स्टॅलिन यांच्या मंत्रिमंडळातील काही नावं ही विशेष लक्ष वेधून घेत आहेत.

मंत्रिमंडळातील आर.गांधी आणि के.एन नेहरू ही नावं सध्या चर्चेचा विषय बनली आहेत. गांधी हे तामिळनाडूच्या राणीपेठ विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत तर नेहरू हे तिरूची पश्चिम मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. नावात काय आहे असं म्हटलं जातं, पण जर तामिळनाडूच्या मंत्रिमंडळाकडे पाहिलं तर, नक्की नावातच सर्व काही आहे, याचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही.

तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करुणानिधी यांचे सुपुत्र असलेले एम.के स्टॅलिन यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तब्बल 10 वर्षांनंतर एम के स्टॅलिन हे तामिळनाडूची सूत्र आपल्या हातात घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीत डीएमके पक्षाला जनतेने कौल दिल्यामुळे डीएमके पक्षाचे वर्चस्व पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या –

“आम्हाला दोनवेळा निवडून दिलंय, आम्हाला जनतेची काळजी आहे”

महाराष्ट्रातील ‘या’ शहराची कोरोनामुक्त होण्याकडे वाटचाल सुरू; रूग्णसंख्येत तब्बल 8 हजारांची घट

चिंता वाढली! गेल्या 24 तासात देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ

महाआघाडीतील नेत्यांची सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्या 13 जणांवर गुन्हा दाखल

‘मराठे कधी पाठीमागून वार करत नाहीत,समोरून वार करतात’; आमदार शशिकांत शिंदे यांची संतप्त प्रतिक्रिया

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More