Top News विधानसभा निवडणूक 2019

मोदी सरकारने सोनिया, राहुल आणि प्रियांका या तिघांचीही एसपीजी सुरक्षा हटवली

मुंबई |  नरेंद्र मोदी सरकारने आज सोनिया गांधी,राहुल गांधी, आणि प्रियंका गांधी या तिघांचीही एसपीजी सुरक्षा काढून घेतली आहे. इथून पुढे या तिघांना केवळ झेड प्लस सिक्युरिटी असणार आहे.

गांधी कुटुंबाला आता एसपीजीऐवजी झेड प्लस सुरक्षा देण्यात येणार आहे. या सुरक्षेची जबाबदारी सीआरपीएप कमांडोंकडे असणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. याआधी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचीही एसपीजी सुरक्षा हटवून त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या ४ व्यक्तींनाच भारतात एसपीजी सुरक्षा आहे. मात्र गांधी कुटुंबाची एसपीजी सुरक्षा काढून घेतल्याने आता यापुढे मोदींनाच एसपीजी सुरक्षा असणार आहे.

दुसरीकडे मोदी सरकारने गांधी कुटुंबाची एसपीजी सुरक्षा काढून घेतल्याने काँग्रेस नेत्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. ज्यांच्या परीवारातील दोन प्रमुख व्यक्तींची हत्या अतिरेकऱ्यांनी केली त्या परीवारातील सोनिया जी, राहुल जी व प्रियंका जी यांची सुरक्षा कमी करणे म्हणजे राजकीय षड्यंत्रच आहे, अशी टीका युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या