Top News राजकारण

गांधी कुटुंंबाने आता काँग्रेस सोडावी- रामचंद्र गुहा

नवी दिल्ली | काँग्रेस कधीच भाजपाला पर्याय म्हणून पुढे येऊ शकत नाही. तसंच गांधी कुटुंबाने आता काँग्रेस सोडावी असं मत प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी व्यक्त केलंय.

याचसोबत रामचंद्र गुहा यांनी त्यांच्या लेखामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा हे भाजपाचे तिन्ही प्रमुख नेते एकमेकांशी वैचारिक पातळीवर जोडलेले आहेत. शिवाय या तिघांमध्येही हिंदुत्वावर आधारित राजकारण पुढे घेऊन जाण्याची ताकद असून ते हीच गोष्ट करत असल्याचं त्यांनी म्हटलंय.

भाजपपेक्षा काँग्रेसची परिस्थिती उलट आहे. काँग्रेसमधील तीन मोठे नेते हे वैचारिक पातळीवर एकमेकांशी जोडलेले नाही दिसत. मुळात सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी काँग्रेसचे सर्वात मोठे नेते आहेत, कारण त्यांचा संबंध गांधी कुटुंबाशी आहे, असंही गुहा म्हणालेत.

गुहा पुढे लिहितात, पुढील लोकसभा निवडणुकींसाठी अजूनही 3 वर्षे बाकी आहेत. त्यामुळे या कालावधीमध्ये काँग्रेसने स्वत:ला पुन्हा उभं केलं पाहिजे.

थोडक्यात बातम्या-

देशातील अॅलोपथी डॉक्टरांचं आज कामबंद आंदोलन

…तर मुंबईत रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत कर्फ्यू-पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल

’31 डिसेंबरपर्यंत तो फलक हटवला नाहीतर…’; तृप्ती देसाईंचा साई संस्थानला इशारा

तुम्ही UPA चं नेतृत्व करणार का?, शरद पवार म्हणतात…

गायिका कार्तिकी गायकवाडचं शुभमंगल सावधान; पाहा लग्नातील निवडक फोटो

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या