बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“गांधीजीची इच्छा होती की भगत सिंग यांना फाशी मिळावी”

नवी दिल्ली | अभिनेत्री कंगणा रणौत हिने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुुळे देशात वादंग पेटलं आहे. त्यातच कंगणाने इन्स्टाग्रामवर केलेली पोस्ट चर्चेचा मुद्दा बनला आहे. तिने इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये “तुम्ही एकतर गांधीचे समर्थक होऊ शकता किंवा नेताजींचे. तुम्ही एकाच वेळी दोघांचे समर्थक नाही होऊ शकत”, असं म्हटलं आहे.

पुढे तिने म्हटलं आहे, “जे स्वातंत्र्यासाठी लढत होते. त्यांना त्यांनी आपल्या मालकाकडे सोपवले. ते सत्तेचे भुकेले आणि धुर्त होते. त्यांच्यामध्ये हिंमत नव्हती. हे तेच लोक होते ज्यांनी आपल्याला शिकवले की कोणी जर आपल्या कानाखाली चापट मारली तर दुसरा गाल पुढे करायचा. असं सांगून ती पुढे म्हणते, असं केल्याने स्वातंत्र्य मिळत नाही, फक्त भीक मागता येते.”

यापुढे तिने गांधीजीवर देखील भाष्य केलं आहे. तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे, “गांधीजीनी भगतसिंग आणि सुभाषचंद्र बोस यांचे कधीच समर्थन केले नाही. असं सांगून पुढे तिने खळबळजनक दावा केला आहे. काही पुरावे आहेत, ज्यावरून वाटते की गांधीजीची इच्छा होती की भगत सिंग यांना फाशी मिळावी,” असा गंभीर आरोपदेेखील कंगणाने यावेळी केला आहे.

यानंतर तिने पोस्टमध्ये असंही म्हटलं आहे, “अशाने स्वातंत्र्य मिळत नाही. फक्त भीक मागता येते. त्यामुळे विचार करून तुमचा हिरो निवडा” असा इशारा तिने पोस्टमध्ये दिला नाही. आधीच कंगणाने केलेल्या वक्तव्यामुळे देशभरात तिच्याविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. त्यातच आता कंगणाच्या नवीन पोस्टमुळे तिच्या अडचणीत आणखी वाढ होणार यात काही शंका नाही.

थोडक्यात बातम्या-

“कोण होतास तू काय झालास तू, अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू”

पुणेकरांचा रिक्षा प्रवास येत्या 22 तारखेपासून महागणार, काय असणार नवे दर?

“देवेंद्रजी उघडा डोळे बघा नीट, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत तुम्ही नाही”

महाराष्ट्रातील कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात पण मृतांचा आकडा वाढला

“आजारी मुख्यमंत्री, आजारी सरकार अशी या सरकारची अवस्था”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More