मुंबई | गांधी जयंतीला होणारी ग्रामसभा रद्द करण्याच्या शासनाच्या निर्णयावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी टीकास्त्र सोडलं आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विटरवर ट्विट केलंय.
देशाला सक्षम आणि समृद्ध बनवण्याचा विचार गांधीजींनी दिला पण सरकार गांधी जयंतीला होणारी ग्रामसभा रद्द करुन त्यांचे विचार संपवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप त्यांनी केलाय. तसेच या प्रकाराचा निषेधही केलाय.
गांधी जयंतीला घेतली जाणारी ग्रामसभा इथून पुढे घेतली जाणार नाही, असं पत्रक सरकारनं काढलं आहे. या पत्रकाचे फोटो त्यांनी आपल्या ट्विटसोबत जोडत सरकारवर हल्ला चढवला आहे. तसेच ही ग्रामसभा का रद्द केली? असा सवालही सरकारला विचारला आहे.
राष्ट्रीय दिनी ग्रामसभा न घेण्याचा निर्णय अनाकलनीय आणि निषेधार्ह आहे. ज्या गांधीजींनी गावे समृद्ध आणि सक्षम करण्याचा विचार या देशाला दिला त्या गांधीजींच्या जयंती दिनी आयोजित केली जाणारी ग्रामसभा का रद्द करण्यात आली. गांधी विचारांना संपवण्याचा हा डाव आहे. सरकारचा जाहीर निषेध ! pic.twitter.com/iJBVrThfpe
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) April 27, 2018
महत्त्वाच्या बातम्या –
-नवरीनं नवऱ्याला पुष्पहार घालताच गोळीबार, चिमुकल्याचा मृत्यु
-रिझर्व्ह बँकेच्या महत्त्वाच्या पदी या नावांची वर्णी लागणार???
-प्रवाशांची लूट करणाऱ्या वाहनांसंदर्भात सरकारकडून मोठी घोषणा
-मुलगी पाचव्या मजल्यावरुन थेट वडिलांच्या अंगावर पडली, वडिलांचा मृत्यु
-नीरव मोदी आता लंडनहूनही पळाला…
Comments are closed.