बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘गंदी बात’ फेम प्रसिद्ध गहनाला ह्रदय विकाराचा झटका, नुकताच झाला होता जामीन

मुंबई | अल्ट बालाजीची प्रसिद्ध अशी अडल्ट सिरीज गंदी बात मधील गहना वशीष्ठला ह्रदय विकाराचा झटका आला असल्याची बातमी समोर आली आहे. गहना तिच्या बोल्ड सिन्समुळे प्रचंड प्रसिद्ध असल्याने तिच्या आजारांबद्दल ऐकून चाहत्यांना देखील धक्का बसला आहे.

गहनाला डायबिटीज आहे. तिला वेळेवर इन्सूलिन देण्याची आवश्यकता असते. अन्यथा तिची तब्येत खुपच खराब होते. अशातच तिला शनिवारी हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गहनाला चक्क दुसऱ्यावेळी हृदयविकाराचा झटका आला आहे. याआधीसुद्धा तिला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यावेळी ती 3 दिवस ऑक्सिजनवर होती.

गहनावर पोर्न व्हिडीओ बनवण्याचा आणि तो इंटरनेटवर अपलोड करण्याचा आरोप आहे. यामुळे तिला मडगाव पोलिसांनी अटक केली देखील केली होती. मात्र गेल्या आठवड्यात ती जामीनावर बाहेर आली होती.

दरम्यान, गहना ही छत्तीसगढ येथील रहिवासी आहे. ‘गंदी बात’ या अडलट् शोमुळे गहना लोकप्रिय झाली होती. तिच्या हॉट आणि बोल्ड अंदाजासाठी तिला ओळखलं जातं. गहनाला शनिवारीचं हृदयविकाराचा झटका आल्याचं म्हटलं जातं आहे. मात्र ही माहिती आज सर्वांसमोर आली आहे

थोडक्यात बातम्या-

“31 जूलैपर्यंत एमपीएससीच्या रिक्त जागांबाबत केलेली घोषणा फसवी आहे”

12 आमदारांवर झालेल्या कारवाईनंतर भाजपची बैठक; बैठकीकडे सर्वांचं लक्ष

भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले…

ह्रदयद्रावक! तीन वर्षाच्या चिमुकल्याच्या अंगावर कोसळली क्राँक्रीट लिफ्ट, जागीच मृत्यू

नियतीचा खेळ! सासऱ्याचा मृतदेह नेत होता जावई अन्…, एकाच दिवशी माय-लेकी झाल्या विधवा

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More