पुणे महाराष्ट्र

पुणे भाजपचा ‘हा’ बडा नगरसेवक अजित पवारांना भेटला; चर्चांना जोरदार उधाण!

पुणे | सत्ताधारी भाजपचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. या भेटींने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या होत्या.

गणेश बिडकर यांनी ही भेट केवळ शहराच्या विकासाच्या संदर्भांत होती, असं स्पष्ट केलं आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

या भेटीत शहराच्या विकासकामांत कोणतंही राजकारण न आणता विविध योजना आणि प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सभागृहात राष्ट्रवादीकडून तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वोतोपरी सहकार्य केलं जाईल, असं आश्वासन पवार यांनी दिलं असल्याचं गणेश बिडकर यांनी सांगितलं.

पुणे महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे शहरातील नदी सुधारणा, मेट्रो प्रकल्प, एचसीएमटीआर असे मोठे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सत्ताधारी भाजपला राज्य शासनाच्या मदतीची गरज भासणार आहे.

थो़डक्यात बातम्या-

“ईडीची नोटीस येणं स्वस्त झालंय, आजकाल कुणालाही नोटीस बजावल्या जातात”

कालपासून ईडीचं कोणी आलं नाही, माझा माणूस भाजप कार्यालयात पाठवलाय- संजय राऊत

रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बोठेच्या अडचणी वाढल्या!

मूठभर बिल्डरांच्या फायद्याचा प्रस्ताव मागे घ्या- देवेंद्र फडणवीस

हे काय पंतप्रधानपद आहे का?; पी चिदंबरम यांनी उडवली शरद पवारांची खिल्ली

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या