Ganesh Chaturthi 2024 | आज 7 सप्टेंबररोजी देशभरातील नागरिक आपल्या लाडक्या बाप्पाला मोठ्या उत्साहात घरी आणतील. आज बाप्पाचे दणक्यात स्वागत केले जाईल. आज गणेश चतुर्थीचा दिवस काही राशीसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. या काळात अनेक ग्रहांच्या चाली बदलत आहेत, ज्याचा परिणाम काही राशीवर दिसून येईल. (Ganesh Chaturthi 2024)
यंदाच्या गणेश चतुर्थीला सर्वार्थ सिद्धी योग, रवि योग, ब्रम्ह योगासारखे शुभ योग बनत आहेत. हा काळ अनेक राजयोगांनी संपन्न झाल्यामुळे त्याचा फायदा हा चार राशींना होणार आहे. आता या 4 राशी नेमक्या कोणत्या आणि त्यांना काय लाभ होणार, ते पाहुयात.
‘या’ राशींचे नशीब हिऱ्यासारखे चमकणार
वृषभ रास : गणपतीच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील. नातेसंबंधात गोडवा वाढेल. कामाशी संबंधित प्रवास फायदेशीर ठरतील आणि तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला मोठ्यांचे मार्गदर्शन मिळू शकेल. गणपती बाप्पाच्या कृपेने तुमचा व्यवसाय वाढीस लागेल. (Ganesh Chaturthi 2024)
कन्या रास : वैवाहिक जीवनात सुख-समृद्धी राहील आणि कुटुंबात एखादा नवीन पाहुणा येण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुम्ही सर्वांचं लक्ष वेधून घ्याल. तुमचे कर्तृत्व उभरून येईल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. आज तुम्हाला बढती मिळेल. विद्यार्थ्यांना आज शिक्षणासाठी मोठ्या संस्थेत जाण्याची संधी मिळेल.
तूळ रास : श्रीगणेशाच्या कृपेने नशीब तुमच्या सर्व कामात साथ देईल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना या काळात नोकरी मिळेल. तुमच्या सर्व मनोकामना आज पूर्ण होतील. तुमच्या विवाह करण्यासाठी येणाऱ्या अडचणी आज दूर होतील. मुलांसाठी आजचा दिवस धावपळीचा असेल.
वृश्चिक रास : तुमच्या कामाच्या पद्धतीत थोडासा बदल करून तुम्ही उत्तम यश प्राप्त कराल. शिक्षणाच्या बाबतीत तुम्हाला नवीन संधी मिळतील. तुम्हाला आर्थिक लाभ होईल.व्यवसाय वाढण्यास तुम्हाला नवे मार्ग मिळतील. कोणताही निर्णय घेण्यासाठी आजचा दिवस शुभ, नशीब तुम्हाला साथ देईल. (Ganesh Chaturthi 2024)
News Title : Ganesh Chaturthi 2024 Horoscope
महत्वाच्या बातम्या-
विनेश फोगाट राजकीय मैदान गाजवणार, कॉँग्रेसमध्ये प्रवेश करताच मिळालं विधानसभेचं तिकीट
गणपती बाप्पाच्या आगमनाने संकटे होतील दूर, ‘या’ राशींचे येणार सुवर्णदिवस
“… म्हणून आम्ही सारखे दिल्लीत जातो”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा