देश महाराष्ट्र

गणेश विसर्जनादरम्यान नाव उलटून 11 गणेशभक्तांचा मृत्यू

Loading...

भोपाळ : मध्य प्रदेशात शुक्रवारी गणपती विसर्जनादरम्यान एक मोठा अपघात झाला आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये गणपती विसर्जनावेळी एक नाव उलटल्याने 18 लोक तलावात बुडाले. या अपघातात 11 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती आहे.

अपघातात आतापर्यंत सहा जणांना वाचवण्यात आलं आहे. भोपाळ येथील तलावात नाव उलटल्याने हा अपघात झाला.

Loading...

खाटलापुरा घाट जवळ पहाटे साडे चारच्या सुमारास ही घटना घडली. या दुर्घटनेचा तपास केला जाईल असं मध्य प्रदेशचे जनसंपर्क मंत्री पीसी शर्मा यांनी सांगितलं. तसेच शर्मा यांनी मृतांच्या कुटुंबियांना चार लाख रुपयांची मदतही जाहीर केली आहे.

NDRF, SDRF आणि होमगॉर्ड्सच्या टीमने आतापर्यंत 11 मृतदेहांना पाण्यातून बाहेर काढलं आहे. यामध्ये लहान मुलं आणि तरुणांचा समावेश आहे. तर आणखी काहीजण या अपघातात दगावल्याची भिती आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

Loading...

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या