बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाविरोधातील लढ्यात पुण्यातील गणेश मंडळाचे कार्यकर्तेही देणार साथ!

पुणे | शहरातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन, सामाजिक भान जपत शहरातील 200 गणेश मंडळांचे कार्यकर्ते महापालिका, पोलीस यांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत सध्याची नेमकी गरज, कामाचे स्वरूप आणि सुरक्षिततेच्या उपायाबाबत चर्चा झाली आहे.

शहराच्या पूर्व भागातील परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत असताना पालिका आणि पोलिस प्रशासनावर ताण वाढला होता. यावेळी गणेश मंडळाचे कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे पुढे येत कोरोनाविरुद्धच्या लढाईत प्रशासनाला मदत करण्यासाठी, रेडझोन परिसरातील संचारबंदी च्या अंमलबजावणीसाठी, रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना मदत करण्यासाठी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरत नागरिकांना विश्वासात घेऊन काम करणार आहेत.

गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची गरज असेल त्या ठिकाणी त्यांच्याकडून मदत घेतली जाणार आहे . यावेळी स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंतजी रासने, अप्पर पोलिस आयुक्त डॉ संजय शिंदे, पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे, मंडळाचे पदाधिकारी प्रताप परदेशी, सुनील रहाटणे, पुनीत बालन, शिरीष मोहिते तसंच इतर मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांमुळे पोलिसांना काही प्रमाणात का होईना आता दिलासा मिळणार आहे. गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या सामाजिक भानाबद्दस पोलिसांनी त्यांचे आभार मानले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

तळीरामांना मोठा दिलासा; दारुची दुकानं सुरू होणार पण…

महाराष्ट्र दिनी केंद्राचा महाराष्ट्राला धक्का; आर्थिक सेवा केंद्र गुजरातला हलवलं

महत्वाच्या बातम्या-

लॉकडाऊन इफेक्ट, उत्तर प्रदेशातून दिसतायत हिमालयाच्या बर्फाच्छादित पर्वतरांगा

राज्यात 24 तासात 1008 नवे कोरोना रुग्ण; एकूण संख्या 11 हजार 500 च्याही वर

पुण्यातून कुणाला जाता येणार गावी?; कसा कराल अर्ज??? जाणून घ्या सर्व माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More