महाराष्ट्र मुंबई

“25 वर्ष गणेश नाईकला लोकांनी मान्य केलंय, मी कुणाला घाबरत नाही”

मुंबई | मी कुणाला घाबरत नाही आणि कुणाचं नाव घेऊन टीका सुद्धा करत नाही, असं म्हणत भाजप नेते गणेश नाईक यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना प्रत्युत्तर दिलंय.

भावे नाट्यगृहात महाविकास आघाडीचा मेळावा पार पडला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी गणेश नाईकांवर टीकास्त्र सोडलं होतं. याला नाईकांनी उत्तर दिलंय.

25 वर्ष गणेश नाईकला लोकांनी मान्य केलंय. मी आजवर कुठलाही भ्रष्टाचार केला नाही. भ्रष्टाचार केला, असा आरोप ते करत असतील तर आरोप सिद्ध करा, असं गणेश नाईक म्हणाले.

मी भाजपमध्ये आहे आणि राहीन. मी भाजप सोडणार नाही. महापौर भाजपचाच बसेल, असा विश्वासही गणेश नाईक यांनी व्यक्त केलाय. ज्यांना जी टीका करायची ती करू द्या. मी जनसेवेचा वसा कायम ठेवेन, असंही गणेश नाईक म्हणालेत.

थोडक्यात बातम्या-

शास्त्रीय संगीतकार उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचं निधन!

पोल्ट्रीतील कोंबड्या नष्ट करण्यासाठी घेऊन जात असताना चिमुरडा ढसाढसा रडला!

“भाजपने सर्वांना धंद्याला लावलंय, त्यांनी शेतकऱ्यांनाही सोडलं नाही”

आरोग्य विभागात ‘इतक्या’ हजार पदांची भरती होणार; राजेश टोपेंची मोठी घोषणा

‘…तर भर चौकात त्यांना जोड्यानं मारू’; राम कदम आक्रमक

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या