बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘ये तेरे बस की बात नहीं, तेरे बाप को बोल’; गणेश नाईकांच आव्हाडांना प्रत्युत्तर

मुंबई | राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नवी मुंबईतील राष्ट्रवादीच्या युवक मेळाव्यात राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या गणेश नाईकांवर घणाघाती टीका केली होती. यावर भाजप नेते गणेश नाईक यांनी आव्हाडांना देताना सिनेमातील डायलॉग मारत प्रत्युत्तर दिलं आहे.

ये तेरे बस की बात नहीं, तेरे बाप को बोल और नाम पुछे तो बोल गणेश नाईक, हा अभिनेते नाना पाटेकर यांच्या सिनेमातील डायलॉग नाईकांनी पलटवार केला आहे.

कोणी मुंबईवरुन, कोणी ठाण्यावरुन, कोणी पुण्यावरुन या शहराचा कारभार करु शकतं का? आणि करु शकतील, तर पहिला तुमच्या शहरात करा, असं म्हणत गणेश नाईकांनी आव्हाडांसोबत राष्ट्रवादीवरही निशाणा साधला.

दरम्यान, राजकीय महत्वाकांक्षेपोटी गणेश नाईकांनी मुलाला भाजपमध्ये पाठवून त्याचा बळी दिल्याची जहरी टीका आव्हाड यांनी केली होती.

ट्रेंडिंग बातम्या-

पवारसाहेब काहीच गुपचूप करत नाहीत- छगन भुजबळ

राज ठाकरेंच्या भेटीनंतर मिलिंद एकबोटे म्हणतात…

महत्वाच्या बातम्या-

“घरी हातात हात दिला तरी चालेल पण बाहेर मात्र लांबूनच नमस्कार करा”

वंचितला खिंडार; माजी आमदारासह 44 पदाधिकारी करणार राष्ट्रवादीत प्रवेश?

…म्हणून अमृता फडणवीस ट्रोल होतात- अदिती तटकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More