मुंबई | मुंबईच्या राजकारणातील मातब्बर नाव भाजप आमदार गणेश नाईक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबई पोलीस महिलेच्या तक्रारीवरून नाईक यांच्या मागावर आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये गणेश नाईक यांच्याविरोधात तक्रारी नोंदवल्या होत्या. परिणामी नाईक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तब्बल दोन महिन्यांपासून हे प्रकरण चालू असताना आता ठाणे न्यायालयानं देखील नाईक यांचा अटकपुर्व जामीन फेटाळला आहे. ठाणे न्यायालयानं अटकपुर्व जामीन फेटाळल्यानं नाईकांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
सीबीडी पोलीस आणि नेरूळ पोलीस नाईकांचा शोध घेत आहेत. नाईक यांच्यावर सध्या दोन गुन्हे दाखल आहेत. परिणामी नाईक यांनी दोन्ही गुन्ह्यात जामीन मिळावा यासाठी अर्ज दाखल केला होता.
दरम्यान, गणेश नाईक गेल्या काही दिवसांपासून फरार आहेत. त्यामुळे आता त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम असल्याने कोणत्याही क्षणी त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.
थोडक्यात बातम्या –
“एक लांडगा महाराष्ट्राच्या कळपात घुसलाय”; पडळकरांची शरद पवारांवर जोरदार टीका
“संजय राऊत यांना माझ्या पत्नीची मागी मागावीच लागेल”
“राज ठाकरे तुम्ही संभाजी महाराजांच्या चरणी नाक घासून माफी मागा”
भाषणापूर्वी ‘अशी’ असते राज ठाकरेंची अवस्था, शर्मिला ठाकरेंनी केला खुलासा
“पाणी डोक्यावरून जात असेल तर त्याच पाण्यात आम्हाला इतरांना बुडवावं लागेल”
Comments are closed.