बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

यंदा गणेशोत्सव साजरा होणार; लालबागच्या भक्तांसाठी ‘ही’ आनंदाची बातमी


मुंबई | कोरोनामुळे देशातील आणि राज्यातील अनेक सांस्कृतिक आणि धार्मिक उत्सवांवर बंधनं आली आहेत. महाराष्ट्रात गणेशोत्सव हा मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येतो. पण गेल्यावर्षी कोरोना संकटाच्या पार्श्वभुमीवर राज्यात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आला नाही. कोरोनामुळे शासनाकडुन अनेक निर्बंध घालण्यात आले होते.

कोरोनामुळे 2020 मध्ये लालबागचा राजा बसवण्यात आला नव्हता. मात्र, मंडळाने ‘आरोग्य उत्सव’ साजरा केला होता, त्यामध्ये प्लाझ्मा आणि रक्तदानाचा सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आला होता. यावर्षी गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी म्हणजे लालबागचा राजा यंदा विराजमान होणार आहे. कोरोनाचे सर्व नियम आणि बंधनं पाळून यंदा लालबागच्या राजाचा गणेशोत्सव सोहळा पार पडणार आहे.

यंदाच्या वर्षीचा गणेशोत्सव अगदी साधेपणाने केला जाणार आहे. शासनाने मुर्तींच्या उंचीबाबत जे नियम घालून दिलेत, त्या नियमांचं पालन गणेशमंडळाकडुन करण्यात येणार आहे. भाविकांना यावर्षी दर्शनासाठी ऑनलाईन बुकींग करता येणार असून
इथून पुढे ज्या सुचना राज्य शासन करेल, त्याचं पालन मंडळाकडून करण्यात येईल, असं लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी म्हटलं आहे.

गणेशमुर्तींची कोणतीही मर्यादा शासनाने घालू नये, अशी मागणी मंडळाने केली होती. मात्र, शासनाने नियम घालून दिले आहेत. या नियमांचं पालन मंडळाकडुन केलं जाईल, असं मंडळाकडुन स्पष्ट करण्यात आलं आहे. यावर्षीं अगदी साधेपणाने गणपती प्रतिष्ठापना आणि पुजा होणार आहे. शासनाने घालून दिलेल्या सर्व गाईडलाईन्स आणि नियम पाळले जातील, असं साळवी यांनी बोलून दाखवलं आहे. भाविकांना दर्शन आणि प्रसादाची सुविधा मंडळाकडून ऑनलाईन उपलब्ध केली जाणार आहे.

थोडक्यात बातम्या –

धोका वाढतोय! ‘या’ जिल्ह्यातील कोरोना रूग्णांच्या आकड्याने मुंबईलाही टाकलं मागे

कोलकाता पाॅर्न रॅकेट प्रकरणात आणखी एका फोटोग्राफरला अश्लील व्हिडीओ बनवण्याच्या आरोपात अटक

अखेर ‘या’ शहरात 15 ऑगस्टपासुन हेल्मेटसक्ती; हेल्मेटशिवाय पेट्रोलही मिळणार नाही

भर मंडपात नवरा सोडून भलत्यानेच केलं नवरीला किस अन्…

“आम्हाला कोणी थप्पड मारण्याची भाषा करु नये, अशी थप्पड मारू की…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More