औरंगाबाद महाराष्ट्र

धक्कादायक! परराज्यातून आलेल्या तरुणीवर औरंगाबादेत सामूहिक बलात्कार

औरंगाबाज |वाराणसीहून औरंगाबादेत आलेल्या एका तरुणीवर सामूहिक बलात्काराचा धक्कादायक प्रकार घडला आहे.  रेल्वे स्थानक परिसरात हा प्रकार घडला आहे.

पीडित तरुणी वाराणसीवरुन आपल्या नातेवाईकांसोबत औरंगाबादेत आली होती. पण ही तरुणी रस्ता चुकली त्यामुळे तिची आणि नातेवाईकांची भेट होत नव्हती. त्यावेळी तरुणीला एकटं पाहून अज्ञातांनी  रेल्वे स्थानक परिसरातच एका निर्जन स्थळी नेत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

या प्रकरणात औरंगाबादच्या उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरा घाटी रुग्णालयात पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

दरम्यान, या प्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तीन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

थोडक्यात बातम्या-

“ये पब्लिक सब जाणती है, सुरक्षा कमी करणं हा सरकारचा खुजेपणा”

‘सुरक्षा काढण्याची परंपरा भाजपचीच’; अब्दुल सत्तारांचं भाजप नेत्यांना प्रत्युत्तर

“पीडित कुटुंबाच्या सांत्वनासाठी शब्दही नव्हते, केवळ हात जोडून उभा राहिलो”

“लोकप्रतिनिधींना सुरक्षेची गरज नाही, सुरक्षेची खरी गरज महिलांसह संपूर्ण जनतेला”

मला सुरक्षेची गरज नाही, मी फिरत राहणार- देवेंद्र फडणवीस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या