बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मन सुन्न करणारी घटना; सख्ख्या आईच्या संमतीने 15 वर्षांच्या मुलीवर 30 जणांनी केला बलात्कार

बंगळुरु | कर्नाटकातील चिक्कमंगळुरु येथे एक संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये सख्या आईने तिच्या पोटच्या पोरीवर बलात्कार करण्याची परवानगी दिल्याचं समोर आलं आहे. हे प्रकरण समोर येताच संपूर्ण परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे.

आरोपी महिला ही श्रीनगेरी तालुक्यातील एका गावात राहणारी आहे. या महिलेची दोन लग्न झाली असून पहिल्या पतीकडून तिला एक मुलगी आहे. मात्र तिचा हा संसार फार काळ टिकला नाही आणि दोघांचा घटस्पोट झाला. त्यानंतर तिने श्रीनगेरी तालुक्यातील एका पुरुषाशी लग्न गाठ बांधली आणि तोही संसार फिस्कटला.

तिची मुलगी तिची भाची आहे, असं खोट सांगून तिने तिच्या मुलीला दुसऱ्या नवऱ्याच्या घरी आणलेलं. मात्र दोघांचा घटस्पोट झाल्यानंतर उदर्निवाह होत नसल्याने आपल्या पोटच्या मुलीला तिने वेश्या व्यवसयात ढकलं. 1 सप्टेंबर 2020 ते 27 जानेवारी 2021 या पाच महिन्यांत 15 वर्षांच्या मुलीवर तब्बल 30 जणांनी बलात्कार केल्याचं समोर आलं आहे.

दरम्यान, हा प्रकार समोर आल्यानंतर आरोपी महिलेने ती तिच्या मुलीची मावशी असल्याचं पोलीसांना सांगितलं होतं. मात्र खोलवर तपासणी केल्यानंतर आरोपी महिला मुलीची आई असल्याचं उघडकीस आलं. यानंतर पोलीस देखील हैराण झाले. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

थोडक्यात बातम्या-

‘पीछे हटो पीछे…’; दीप प्रज्वलन करताना फोटोसाठी पुढे आलेल्या बाबूल सुप्रियोंवर अमित शहा भडकले, पाहा व्हिडीओ

“महाराष्ट्र सरकारने 100 कोटींच्या वसुलीचा आधी हिशेब द्यावा”

औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात कोरोना रुग्णांचे प्रचंड हाल!

‘…तर तो सरळ सरळ लोकशाहीचा खून आहे’; शिवसेनेची मोदी सरकारवर टीका

मोठी बातमी! महाविकास आघाडीचे नेते घेणार राज्यापालांची भेट

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More