कोचिंग क्लासवरुन परतणाऱ्या 19 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार

भोपाळ | कोचिंग क्लासवरुन परतणाऱ्या 19 वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्कार करण्यात आलाय. भोपाळच्या हबीबगंजमध्ये ही धक्कादायक घटना घडलीय. 

चौघा आरोपींनी पीडित मुलीचं हबीबगंज रेल्वे स्थानकावरुन अपहरण केलं. जवळच्या पुलाखाली नेऊन तिच्यावर बलात्कार केला. धक्कादायक बाब म्हणजे चहा, सिगरेटसाठी ब्रेक घेत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर मुलगी मृत झाल्याचा संशय आल्यानं त्यांनी तेथून पळ काढला. 

महत्त्वाचं म्हणजे या मुलीचे वडील पोलिस निरीक्षक तर आई गुन्हे अन्वेषण विभागात आहे. पोलिसांनी चारही संशयित आरोपींना अटक केलीय.