Top News

पॅरोलवर बाहेर आलेल्या कुख्यात डॉन अरुण गवळीची गरजूंना मदत, पाहा व्हिडीओ

मुंबई | पॅरोलवर बाहेर आलेला कुख्यात डॉन अरुण गवळी याने लॉकडाऊनच्या काळात गरजू कुटुंबाना मदतीचा हात दिला. मुंबईतील भायखळा परिसरात असलेल्या दगडी चाळीत अनेक कुटुंबांना त्याने जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं आहे.

‘कोरोना’ विषाणूच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य माणसांचं जगणं विस्कळीत झालं आहे. रोजंदारी करणारे चाळीतील रहिवाशी, भूमीहीन किंवा हातावर पोट असणारे गोरगरीब हतबल आहेत. अनेक जणांवर उपासमारीची वेळ आली आहे.

दगडी चाळ भागातील 60 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या गरीब आणि गरजू व्यक्तींना एक महिना पुरेल इतके जीवनावश्यक वस्तूंचे किट गवळी कुटुंबाने दिले.

लॉकअपमधून बाहेर पडलेला अरुण गवळी लॉकडाऊनमध्ये घरी अडकला आहे. काही आठवड्यापूर्वी कॅरम खेळतानाचा त्याचा व्हिडीओ त्याची मुलगी योगिताचा पती आणि अभिनेता अक्षय वाघमारेने सोशल मीडियावर शेअर केला होता.

 

 

View this post on Instagram

 

😇🙏 #stayhome #staysafe

A post shared by Akshay Waghmare (@akshayswaghmare) on

ट्रेंडिंग बातम्या-

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या