नागपूर | कुख्यात डॉन अरुण गवळीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठीने पॅरोल मंजूर केला आहे. अरुण गवळी सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.
पत्नी आजारी असल्याच्या कारणास्तव गवळीने 30 दिवसांची पॅरोल रजा मागितली होती. नागपूर विभागीय आयुक्तांनी अरुण गवळीचा पॅरोलचा अर्ज फेटाळला होता. त्यामुळे गवळीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
अखेर उच्च न्यायालयाने गवळीला दिलासा देत पॅरोल मंजूर केला आहे. अरूण गवळी शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.
दरम्यान, अरुण गवळी याआधीही 3 ते 4 वेळा जेलबाहेर आला आहे. मुलाचं लग्न, आजारपण अशी कारणं देत अरुण गवळी जेलबाहेर आला होता.
ट्रेंडिंग बातम्या-
‘नशीब ते जिवंत तरी आहेत’; न्यायमूर्तीच्या बदलीवरून रिचा चड्डाचा केंद्र सरकारला टोला
मराठीचं वाकडं करण्याची हिंमत कुणातही नाही- उद्धव ठाकरे
महत्वाच्या बातम्या-
‘येसूबाईं’ना नाही आवरेना लाठीकाठी खेळण्याचा मोह; पाहा व्हिडीओ
कोरेगाव भीमा प्रकरणातील 348, तर मराठा आंदोलनातील 460 गुन्हे मागे- अनिल देशमुख
दुसऱ्याला वाचवायला जाऊन माझ्या मुलानं जीव गमावला; आयबी अधिकाऱ्याच्या आईची प्रतिक्रिया
Comments are closed.