मुंबई | कोरोनामुळे संपूर्ण देश 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेशिवाय कुणालाही बाहेर पडण्यास मज्जाव आहे. यामुळे सर्वजण घरकाम करताना किंवा घरी कसा वेळ घालवत आहोत, याबाबतचे फोटो, व्हिडीओ शेअर करत आहेत.
कुख्यात गुंड अरुण गवळी सध्या पॅरोलवर असून, तो सध्या घरीच आहे. गँगस्टर गवळीच्या जावयाने सोशल मीडियावर ‘अरुण गवळी ’चा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अरुण गवळी कुटुंबीयांसोबत कॅरम खेळताना दिसत आहे.
मुली गीता आणि योगितासोबत अरुण गवळी कॅरमवर हात आजमवताना दिसत आहे. हा व्हिडीओ योगिताचा पती अभिनेता अक्षय वाघमारेने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
कुख्यात डॉन अरुण गवळीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 27 फेब्रुवारीला पॅरोल मंजूर केला आहे. अरुण गवळी सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
लाईट बंद करण्यावरून आजी माजी उर्जामंत्र्यांमध्ये जुंपली
“निवडणुकीला कुणाला मतदान करायचं?; हे सांगणारे मुल्ला-मौलवी कुठे आहेत?”
महत्वाच्या बातम्या-
“महाराष्ट्रातील लॉकडाउनचा कालावधी ‘इतक्या’ दिवसांनी वाढवला जाऊ शकतो”
पंजाबमधून दिसायला लागली 200 किलोमीटर अंतरावरची हिमालयाची शिखरं!
निवडणूक आयोगाचा आदेश जारी; महाविकास आघाडीचं सरकार संकटात!
Comments are closed.