पुणे | पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेला पुणे ग्रामीण पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने बेड्या ठोकल्या आहेत. पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सातारा पोलिसांकडून गजानन मारणेला ताब्यात घेऊन सकाळी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास येरवडा कारागृहात आणलं होतं. तर आता गजा मारणेचा परस्पर टोळीयुद्धातील कुख्यात गुंड शरद मोहोळवरही पुणे पोलिसांनी कारवाई केली आहे.
शरद मोहोळने कारागृहातून सुटल्यावर पतीत पावन संघटनेच्या सुर्वण महोत्सवी कार्यक्रमात सहभागी झाला होता. त्यावेळी त्याने केलेल्या शक्ती प्रदर्शनावरून त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनी शरद मोहोळ आणि त्याच्या 16 साथीदारांना दोन महिने शहरात प्रवेश करण्यास तसेच वास्तव करण्यास मनाई केली आहे.
गुरुवार पेठेतील कृष्णहट्टी चौकात पतीत पावन संघटनेच्या शाखेचे 50 वा वर्धापन दिनानिमित्ता सत्यनारायण महापुजेचे 26 जानेवारी रोजी आयोजन केलं होतं. त्यावेळी गर्दी करुन आरडाओरडा परिसरात दहशतीचं वातावरण गँगस्टर सचिन मोहोळ आणि त्यांचे साथीदारांनी केलं होतं. त्यामुळे खडक पोलिसांनी 16 फेब्रुवारी रोजी त्याच्यासह साथीदारांवर गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, पतीत पावन संघटनेच्या शाखेच्या वर्धापन दिनावेळी मोहोळच्या समर्थकांनी बेकायदेशीरपणे गर्दी केली होती. त्यावेळी त्यांनी कोरोनाची कोणत्याही प्रकारची काळजी घेतली नव्हती.
थोडक्यात बातम्या-
काय सांगता! लोकांना सापडलाय सोन्याचा डोंगर, सोनं लुटण्यासाठी तुफान गर्दी, पाहा व्हिडीओ
…म्हणून राज ठाकरे मास्क घालत नसतील- रामदास आठवले
#Corona पुण्यात आजही कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ; जाणून घ्या सविस्तर आकडेवारी
राज्यातील ‘हा’ जिल्हा प्रत्येक शनिवार, रविवार राहणार पूर्ण बंद
“मी कधीही विचार केला नव्हता की देशातील सर्वात मोठ्या नेत्यासोबत बसायला मिळेल”
Comments are closed.