बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

KBC मध्ये धोनीबाबत विचारलेल्या ‘त्या’ प्रश्नावर वीरू आणि दादा निरूत्तर, हा होता प्रश्न!

मुंबई | सोनी टीव्हीवरील बिग बी अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेला कौन बनेगा करोडपती शो अनेक लोकांच्या पसंतीस उतरत आहे. अलिकडेच या शोच्या हॉटसीटवर बीसीसीआय अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली आणि धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग आले होते. यावेळी कौन बनेगा करोडपतीचा कर्मवीर स्पेशल एपिसोडचं प्रसारण करण्यात आलं आहे.

भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममधल्या कधीही ऐकायला न मिळालेल्या गोष्टी या शो मध्ये सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवाग यांनी सांगितल्या. तर काही वेळ गांगुलीने या कार्यक्रमात सूत्रसंचालन केलं. त्यावेळी अमिताभ बच्चन यांना त्या हॉटसीटवर बसून गांगुलीने बच्चन यांना प्रश्न विचारले.

गांगुली आणि सेहवाग जोडीने सुरूवातीच्या 7 प्रश्नांसाठी एकही लाईफ लाईन घेतली नव्हती. 25 लाखांच्या प्रश्नांसाठी एकही लाईफ लाईन घेतली नसताना योग्य उत्तर दिलं. परंतु भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने त्याच्या करिअरमध्ये कोणत्या खेळाडूला बाद केलं होतं?, असा प्रश्न दोघांना विचारण्यात आला. तेव्हा त्यांना या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. त्यासाठी त्यांनी 50-50 लाईफ लाईन वापरली होती.

दरम्यान, जिंकलेले 25 लाख रूपये दोघांनी त्यांच्या नावाने सुरू असलेल्या सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवाग फाउंडेशनला दिले. विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर ट्रॅव्हिस डाऊनलीन असं होतं. 2009 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये धोनीने डाऊनलीनला बाद केलं होतं.

थोडक्यात बातम्या-

कौतुक हवं! जगातील अब्जाधीशांच्या यादीत पुण्यातील ‘या’ उद्योजकाचा नंबर!

शिवसेना मेळाव्यात संजय राऊतांच्या सभेला खचाखच गर्दी, मुख्यमंत्र्याच्या आदेशाला केराची टोपली!

“जावेद अख्तर यांचा चेहरा पुरोगामी असला तरी त्यांचे अंतरंग कट्टरवादीच”

सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूवर अजित पवारांची प्रतिक्रिया, पाहा व्हिडीओ

‘दीपालीच्या मृत्यूनंतरही छळ सुरुच…’, चित्रा वाघ संतापल्या, पाहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More