Top News जळगाव

दादा कुणाला म्हणायचं? या कारणावरुन दोन गटात गँगवॉर; 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव | जळगावात दोन गटांमध्ये वाद होऊन गँगवॉर झाल्याची घटना समोर आली आहे. मुख्य म्हणजे दादा कोणाला म्हणायचं या मुद्द्यावरून गँगवार झाला आहे.

‘तू दादा कि मी दादा’ म्हणत दादागिरीच्या वर्चस्वातून दोन गटात गँगवॉर उफाळलं होतं. या प्रकरणात एमआयडीसी पोलीस ठाण्यात 12 जणांविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न, दंगल तसंच शस्त्रं बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविवारी दुपारी कुसुंबा टोल नाक्याजवळ किरण खर्चे आणि विशाल अहिरे यांच्या गटात गँगवॉर झालं होतं. पोलिसांनी दोन्ही गटातील सात संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात 28 वर्षीय विशाल राजू अहिरे आणि 27 वर्षीय किरण खर्चे अजून 2 असे एकूण चार जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या रूग्णालयात उपचार सुरु आहेत.

या प्रकरणात सात जणांना अटक करण्यात आली आहे. या सातंही जणांना न्यायालयाने 17 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

महत्वाच्या बातम्या-

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सुप्रिया सुळे आक्रमक; ‘या’ मुद्द्यावरून मोदी सरकारला घेरलं!

…नाहीतर सत्ताधारी आणि विरोधकांना नागडं करुन मारु; मराठा आंदोलकाचा इशारा

कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार सर्व पदं त्वरित भरणार- आरोग्यमंत्री

“ठाकरे ब्रँड हे काय नवीन काढलंय?, राज्यात एकच ब्रँड ते म्हणजे…”

भाजप प्रवक्त्याने मराठी अभिनेत्रींबद्दल केलेल्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर बांदेकर संतापले; म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या