विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर गणपत गायकवाड तुरूंगाबाहेर येणार?

Ganpat Gaikwad | राज्याच्या राजकारणातून एक मोठी अपडेट समोर येत आहे. त्याची सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर वेगवेगळे ट्विस्ट निर्माण होणार असल्याचं दिसून आलं आहे. अशातच आता या विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने एक चाल खेळली आहे. भाजप नेते आणि उल्हासनगर पोलीस ठाण्यात गोळीबार करणारे गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुरूंगातून बाहेर काढण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. यावरून आता वातावरण चांगलं पेटलं आहे.

गणपत गायकवाडांना तुरूंगाबाहेर काढण्याआधी विरोधकांनी तोंडसुख घेतलं

भाजपने गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांना तुरूंगाबाहेर काढण्याआधी विरोधकांनी तोंडसुख घेतलं आहे. हा सत्तेचा दुरुपयोग  आहे. आपण न्यायव्यवस्थेवर बोलू शकत नाही. गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी  स्वत: गोळी झाडली आहे. यावर निवडणूक आयोग बायस काम करत आहे का? असा सवाल आता विरोधकांनी उपस्थित केला आहे. निवडणूक आयोग हा भाजपच्या घरातला गडी असल्याचा टोला विरोधकांनी लावला आहे.

सत्तेचा गैरवापर केला जात आहे. उघड्या डोळ्याने सर्व पाहत असल्याचं विरोधकांनी सत्ताधारी भाजपवर ताशेरे ओढले आहेत. यावेळी निवडणूक आयोगावर आक्षेप नोंदवला असल्याचं अंबादास दानवे म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांना आणि आम्हाला वेगवेगळा न्याय का? असा देखील सवाल उपस्थित केला आहे.

माझ्यावर खोटे आरोप करून जेलमध्ये टाकण्यात आलं होतं. त्यावेळी विधानसभा परिषदेच्या निवडणुकीसाठी परवानगी मागितली पण मला मिळाली नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांच्यासाठी वेगळा न्याय आणि आपल्यासाठी वेगळा न्याय असं चित्र आहे. अशातच आता भाजपचा लोअर कोर्टावर गंभीर दबाव असल्याचं अनिल देशमुख यांनी दावा केला आहे.

संजय राऊतांचं वक्तव्य

ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही विधानपरिषदेच्या निवडणुकीवर भाष्य केलं आहे. “येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांचाच विजय होणार आहे. अजित पवार गट, शिंदे गटाची म्हणवी अशी मतं नाहीत. भाजपला देखील त्यांचा उमेदवार निवडून आणण्याइतपत मते नाहीत. तर काँग्रेसकडे त्यांचा उमेदवार निवडून आणण्याइतपत मते आहेत, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

महाराष्ट्राची सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आणि लोकसभेचे निकाल पाहता अनेक आमदार हे महाविकास आघाडीच्या बाजूने झुकलेले आहेत. 23 मतांचा कोठा आहे, मला पूर्ण खात्री आहे सध्याच्या परिस्थितीत महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार निवडून येतील त्याविषयी आमच्या मनात शंका नाही. यासाठी स्वत: शरद पवार, उद्धव ठाकरे, जयंत पाटील आणि त्यांचे सहकारी यशस्वीपणे काम करतील, असा विश्वास संजय राऊतांना आहे.

News Title – Ganpat Gaikwad News Update Over Maharashtra MLC Election

महत्त्वाच्या बातम्या

आठवड्याच्या शेवटी सोनं महागलं; 10 ग्रॅमसाठी आता..

देशात ‘या’ चारचाकी वाहनांची खरेदी करण्यासाठी मिळणार सवलत!

दारू घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांना कोर्टाकडून मोठा दिलासा; अखेर..

आज ‘या’ राशीच्या लोकांचं नशीब फळफळणार, पैसा अन् सन्मान भरभरून मिळणार

शहाजीबापू रुग्णालयात तर गणपत गायकवाड जेलमध्ये; महायुतीचं मतांचं गणित बिघडणार?