Ganpati 2024 l अवघ्या तीन दिवसांनी गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. यामुळे सर्वजण गणेशाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे पूजा, प्रसादाची तयारी, डेकोरेशन या सर्व कामांची लगबग जोरदार सुरू झाली असून गणपती बाप्पा मोरयाचा गजर करच बाप्पा सार्वजनिक मंडळातही लवकरच विराजमान होणार आहेत. मात्र अशातच आता पोलिसांनी काही महत्वाचे आदेश दिले आहेत. गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी पोलिसांनी काही निर्देश जारी केले आहेत.
नेमका आदेश काय आहे? :
गणपती बाप्पाच्या विसर्जनानंतर गणेशाच्या मूर्तींचे फोटो काढून नका असे आदेश यंदाच्या वर्षी पोलिसांनी दिले आहेत. कारण विसर्जन झाल्यावर गणरायाच्या मूर्तीचे फोटो सर्वजण काढतात. मात्र आता फोटो काढले आणि ते प्रसारित केले तर संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. कारण यामुळे धार्मिक भावना दुखावण्याची शक्यता असते, म्हणून पोलिसांनी हे महत्वाचे आदेश दिले आहेत.
अवघ्या तीन दिवसांनी म्हणजेच 7 सप्टेंबर रोजी गणपती बाप्पाचे आगमन होणार असून त्यानंतर दीड दिवसापासून पुढे अनंत चतुर्दशीपर्यंत विविध दिवशी गणरायाचे विसर्जन करण्यात येणार आहे. मात्र त्यासंदर्भातच पोलिसांकडून आदेश जारी केले आहेत.
Ganpati 2024 l पोलीस कडक कारवाई करणार :
यंदाच्या वर्षी 8, 11, 12, 13 आणि 17 सप्टेंबर रोजी गणपती विसर्जनाचा मुहूर्त आहे. मात्र विसर्जनानंतर काही अर्ध्या विरघळलेल्या मूर्ती भरतीच्या वेळी किनाऱ्यावर वाहून येण्याच्या घटना दरवर्षी घडत असतात. तसेच या मूर्ती तलावाच्या पाण्यावर देखील तरंगतात. मात्र यामुळे काही लोक अशा तरंगणाऱ्या मूर्तीचे फोटो काढतात, तसेच महानगरपालिकेचे कर्मचारी देखील मूर्ती गोळा करतानाचे फोटो काढतात आणि कृतीमुळे धार्मिक भावना दुखावल्या जातात. त्यामुळे सार्वजनिक शांतता व भावना भंग पावतील असे फोटो शेअर करतात.
मात्र आता विसर्जनानंतर असे फोटो काढणे किंवा सोशल मीडियावर अपलोड करणे हे प्रतिबंधित करण्यासाठी तत्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करून पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने विसर्जनानंतर गणेश मूर्तींचे फोटो काढू नयेत किंवा ते सोशल मीडियावर प्रसारित करू नयेत अन्यथा पोलीस थेट कारवाई करणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे हा आदेश 8 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर पर्यंत लागू असणार आहे. याशिवाय या आदेशाचे उल्लंघ केल्यास संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई देखील करण्यात येईल आणि दंड देखील ठोठावला जाऊ शकतो.
News Title : Ganpati Festival 2024
महत्वाच्या बातम्या-
पवार साहेबांनी ‘या’ मतदारसंघातील उमेदवार केला जाहीर; बड्या नेत्याला देणार टक्कर
शनीदेव ‘या’ राशींना करणार धनवान, राहूच्या नक्षत्र परिवर्तनाने उजळणार भाग्य
येत्या 48 तासात पावसाचा जोर वाढणार, ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट
“स्टेनलेस स्टील वापरलं असतं तर शिवरायांचा पुतळा पडला नसता”
ढोल-ताशा वादकांसाठी धोक्याची घंटा, तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा