गणपती बाप्पा संदर्भात महत्वाची बातमी; थेट होणार पोलिसांची कारवाई

Ganpati 2024 l गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस काही उरले आहेत. यामुळे सगळीकडे भक्तीमय वातावरण झाले आहे. अशातच मूर्तिकारांचे गणेश बाप्पाची मूर्ती तयार करण्याचे काम सध्या जोरात सुरु आहे. त्यामुळे राज्यात मूर्तिकारांची लगबग जोमाने सुरु आहे. तसेच काहीजण तर विविध शहरातून देखील गणेश मूर्ती आणतात. त्यामुळे काहीजण पर्यावरण पूरक शाडूची मूर्ती तयार करतात. तर काही मूर्तिकार मातीची मूर्ती घरीच तयार करतात.

संभाजी ब्रिगेडने घेतला आक्षेप :

मात्र आजकाल प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या मूर्ती लवकर तयार होतात आणि त्यांच्या किंमती देखील कमी असल्याने त्यांना जास्त मागणी असते. पण मूर्तिकारांनो तुम्हीही प्लॅस्टर ऑफ पॅरीसची गणेश मूर्ती साकारत असाल तर तुमच्यावर थेट पोलीस कारवाई होण्याची शक्यता आहे.

गणपती उत्साहाच्या तोंडावर छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत असलेल्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या बाजारात खरेदीसाठी आल्या आहे. मात्र अशा मुर्त्या चुकीचे असून पावसाळ्यात नदी व नाल्यांना पुर येतो, मात्र त्यातील पाणी हे अस्वच्छ असते. त्यामुळे मूर्ती विसर्जन केल्यानंतर ते व्यवस्थित विरघळली जात नाही, यामुळे दरवर्षी गणेशोस्तव झाल्यावर मूर्ती विटंबनेचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. अशातच आता संभाजी ब्रिगेडने छत्रपती शिवरायांच्या भूमिकेतील गणेश मूर्तीबाबत आक्षेप घेतला आहे.

Ganpati 2024 l …तर पोलीस थेट कारवाई करणार? :

अनेक ठिकाणी गणेशाला विविध रुपात साकारण्यात येत असते. गणपती बाप्पा शिवरायांच्या रुपात देखील साकारले जातात. मात्र गणेशोत्सवाच्या अखेरीस गणपती बाप्पाच्या विसर्जनाची प्रथा आहे. मात्र महापुरुष यांच्या विसर्जनाची प्रथा नाही. त्यामुळे शिवरायांची घोर विटंबना होऊन शिवप्रेमींच्या भावना देखील दुखावल्या जाऊन उद्रेक होण्याची शक्यता असते. यामुळे शिवरायांच्या रुपातील गणपती बाप्पाच्या मूर्त्यांना संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला आहे.

याप्रकरणी संभाजी ब्रिगेडने बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलास पाटील यांच्या निदर्शनास ही गोष्ट आणून दिली आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या मुर्त्या आढळून आल्यास तीव्र आंदोलन छेडू, असे देखील संभाजी ब्रिगेडने तक्रार अर्जात नमूद केले आहे. त्यामुळे याप्रकरणी मूर्ती कलाकारांची व संभाजी ब्रिगेड पदाधिकाऱ्यांची देखील तातडीची बैठक पोलिसांनी घेतली आहे. तसेच मूर्तीकरांना या विषयाचे गांभीर्य लक्षात आणून दिले आहे. याशिवाय असा प्रकार उघडकीस आला तर पोलीस थेट कारवाई करणार आहेत.

News Title : Ganpati Bappa 2024

महत्त्वाच्या बातम्या-

देशात ‘हा’ आजार घालतोय धुमाकूळ; WHO ने दिला इशारा

“हार्दिक पांड्यावर माझं प्रेम, तो माझा..”; प्रसिद्ध अभिनेत्रीचा मोठा खुलासा

आयफोनला विसरा! 108MP कॅमेरा असलेला भन्नाट फोन लाँच; किंमत फक्त…

महिन्याच्या शेवटी दिलासा, सोन्याचे भाव उतरले; काय आहेत सध्या किमती?

मुंबईतली म्हाडाची घर तब्बल ‘इतक्या’ लाखांनी कमी होणार; फडणवीसांनी केली घोषणा