Top News

लाडके बाप्पा निघाले परतीच्या प्रवासाला; राज्यभरात कडेकोट सुरक्षा तैनात

मुंबई | गेले दहा दिवस ज्या गणपती बाप्पाची मनोभावे पुजा केली त्या बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप देण्याची आता वेळ आली आहे. बाप्पाच्या विसर्जनासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.

बाप्पाच्या विसर्जनासाठी मुंबईतील चौपाट्या, तलाव, कृत्रिम तलाव येथे मोठी गर्दी उसळणार आहे. विसर्जन सुरळीत व्हावं यासाठी पोलीस, महापालिका यांसह सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.

मुंबईत 129 ठिकाणी विसर्जन करण्यात येणार असून, पालिकेच्या वतीने 32 ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. 50 हजार पोलिसांसह एसआरपीएफ, फोर्स वन, क्यूआरटी, फोर्स वन, रॅपिड अ‌ॅक्शन फोर्स यांची अतिरिक्त कुमक भाविकांच्या सुरक्षेसाठी तैनात ठेवण्यात आली आहे.

दरम्यान, वाहतूककोंडी होऊ नये, विसर्जन मिरवणुका आणि वाहनचालकांचीही गैरसोय होऊ नये यासाठी मुंबईतील वाहतूक मार्गात मोठे बदल करण्यात आले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या