बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राजकारणातील एका सत्वशील पर्वाचा अस्त; ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख काळाच्या पडद्याआड!

सोलापूर | शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं सोलापुरात आता काही वेळापूर्वी निधन झालं आहे. तसेच यामुळे राजकीय वातावरण शोकाकुल झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी सोलापुरात अखेरचा श्वास घेतला.

दरम्यान, शेकापचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून अत्यवस्थ होती. परंतु, आज अचानक प्रकृती खालावल्याने त्यांचं निधन झालं आहे. त्यातच आता महाराष्ट्रातील राजकारणातील एक मोठा नेता काळाच्या पडद्याआड गेल्याने अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघाचं तब्बल 54 वर्ष प्रतिनिधित्व करणारं नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याने नागरिकांकडूनही शोक व्यक्त करण्यात येत आहे. गणपतराव देशमुख हे 11 वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत.

साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या गोष्टीमुळे गणपतराव देशमुख हे कायमच चर्चेत राहिले होते. गणपतराव देशमुख यांच्या जाण्याने राजकारणातील एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व हरवलं असल्याचं शेकाप नेते जयंत पाटील यांनी बोलून दाखवलं आहे. गणपतराव देशमुख यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती समोर येत आहे.

थोडक्यात बातम्या –

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More