बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बापरे! सर्वसामान्यांचा ताण वाढला, गॅस आणि पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा गगनाला भिडले

नवी दिल्ली | वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांनी अक्षरश: डोक्याला हात लावले आहेत. एनपीजी आणि पीएनजीच्या दरात काही दिवसांपूर्वीच वाढ झाली होती. या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला आधीच कात्री लागली होती त्यात आता स्वयंपाकाच्या गॅसचे दरही गगनाला भिडले आहेत. बुधवारी स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या गॅससोबतच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीतही पुन्हा एकदा वाढ झाली आहे.

सबसिडी आणि विनासबसिडी स्वयंपाक गॅस सिलिंडरच्या किंमतीत 15 रूपयांची वाढ झाली आहे. तर पेट्रोलच्या किंमतीत 24 ते 30 पैशांची तर डिझेलच्या किंमतीत 32 ते 36  पैशांची वाढ झाली आहे. देशातील इंधनदरांनी आत्तापर्यंतचा उच्चांक गाठल्याने सर्वसामान्यांचं टेन्शन मात्र वाढलं आहे.

गॅस सिलिंडरच्या दरात महिन्याला सुधारणा करण्यात येते. बुधवारी झालेल्या दरवाढीनुसार, मुंबईत 14.2 किलोच्या एलपीजी गॅस सिलिंडरसाठी आता तब्बल 926 रूपये इतकी किंमत मोजावी लागणार आहे. इंधनाची वाढती मागणी, जागतिक दरवाढ आणि डॉलरच्या तुलनेत रूपयाची झालेली घसरण या दरवाढीसाठी कारणीभूत असल्याचं म्हटलं जात आहे.

पेट्रोलची किंमत शहरानुसार वेगवेगळी आहे. मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रत्येकी 24 आणि 32 पैशांनी वाढून आता पेट्रोल 108.67 रूपये प्रति लिटर तर डिझेल 98.80 रूपये झाले आहेत. दिल्लीत पेट्रोलचा दर आता 102.94 रूपये लिटर तर डिझेलचे दर 91.42 रूपये लिटर इतके झाले आहे. चेन्नईत पेट्रोलच्या किंमतीत 26 पैशांची तर डिझेलच्या किंमतीत 34 पैशांची वाढ होऊन पेट्रोल 100.49 रूपये लिटर तर डिझेल 95.93 रूपये लिटर झाले आहे. कोलकात्यात पेट्रोलचे भाव 103.65 रूपये लिटर आणि डिझेलचे भाव 94.53 रूपये लिटर झाले आहेत.

 

थोडक्यात बातम्या-

”अंधार आणखी गडद होणार असेल तर हा बदलत्या देशाचा नवा विकास म्हणायचा का?”

राहुल गांधी, प्रियंका गांधी अखेर लखीमपूर पीडित कुटुंबीयांच्या भेटीला, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

‘या’ ठिकाणी मुसळधार पावसानं घर कोसळून पाच जण ठार

लखीमपूर प्रकरणात मोठी घडामोड,सर्वोच्च न्यायालयाची गंभीर पावलं; सरकारच्या अडचणी वाढणार?

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा; सरकारकडून मदत जाहीर

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More