अनुदानित घरगुती गॅस महागला, विना अनुदानित स्वस्त

मुंबई | अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 2 रुपयांची वाढ करण्यात आलीय, तर विना अनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात 92 रुपयांची कपात करण्यात आलीय. मध्यरात्रीपासून नवे दर लागू करण्यात आले आहेत.

 

नुकतीच १ एप्रिल रोजी अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 5 रुपये 57 पैशांनी वाढवण्यात आली होती. दरम्यान, अनुदानित गॅस सिलिंडरची किंमत वेगवेगळ्या राज्यात कर आकारणीच्या आधारे 440 ते 445 रुपयांच्या दरम्यान राहिल.  

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या