Top News देश

सर्वसामान्यांच्या खिशाला फटका; घरगुती गॅस सिलेंडर पुन्हा महागला

नवी दिल्ली | सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा फटका बसणार आहे. कारण घरगुती गॅसच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. तेल कंपन्यांनी आज एलपीजी गॅसच्या किंमतीत वाढ केलीये.

घरगुती गॅसच्या 14.2 किलो वजनाच्या टाकीच्या किमतीत 50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. याशिवाय 5 किलोची छोटी टाकी आता 18 रुपयांनी महागलीये. तर 19 किलोच्या मोठ्या टाकीच्या किमतीत 36.50 रुपयांनी झाली आहे.

इंडियन ऑईलच्या माहितीप्रमाणे, दिल्लीत 14.2 किलो वजनाची विनाअनुदानित गॅसची टाकी 644 रुपयांना मिळणार आहे. तर दिल्लीच्या दराप्रमाणे मुंबईतही गॅस मिळणार आहे.

गॅसच्या किमतीत वाढ झाली असली तर दुसरीकडे पेट्रोल आणि डीझेलच्या दरात कुठलीही वाढ झाली नाहीये. गेल्या 8 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिरावले आहेत.

थोडक्यात बातम्या-

आईची शपथ घेऊन सांगतो; भर सभागृहात मुनगंटीवारांना का घ्यावी लागली शपथ???

ऐकमेकांची डोकी फोडायचीत तर फोडा, पण विज बिलाचं आश्वासनं पूर्ण करा- देवेंद्र फडणवीस

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसदेचं हिवाळी अधिवेशन रद्द!

अजित पवारांनी भर सभागृहात स्वीकारलं सुधीर मुनगंटीवार यांचं ‘ते’ चॅलेंज

फेकुचंद पडळकर म्हणत टीका करणाऱ्या राऊतांना गोपीचंद पडळकरांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या