ऐन दिवाळीच्या तोंडावर मोदी सरकारचा सर्वसामान्यांना झटका

नवी दिल्ली | अनुदानित गॅसच्या दरात 2.94 रुपयांची तर विनाअनुदानित गॅसच्या दरात 60 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मध्यरात्रीपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरु झाली आहे. 

आंतराष्ट्रीय बाजारातील चढउतार आणि डॉलरच्या तुलनेत सुरु असलेली रुपयाची घसरण यामुळे ही दरवाढ करण्यात आली आहे. दरवाढीमुळे विनाअनुदानित गॅस 880 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. 

पेट्रोलियम कंपन्यांनी जून महिन्यापासून गॅसच्या दरात सहावेळी वाढ केली आहे. 

दरम्यान, ऐन दिवाळीच्या तोंडावर गॅस महागला आहे, त्यामुळे सामान्य माणसाचं बजेट विस्कळीत होण्याची शक्यता आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-पंकजा मुंडेंचा स्तुत्य उपक्रम; बचत गटांच्या उद्योजकतेला चालना देण्यासाठी परदेश दौरा!

-हा व्हीडिओ पाहाल तर रोहित शर्माबद्दलचा तुमचा आदर आणखी वाढेल!

-… मंत्री झालो आणि सहकाराचा ‘जाच’ सुरू झाला- सुभाष देशमुख

-फडणवीस हे आंबेडकरी जनतेचा विश्वास जिंकणारे पहिले मुख्यमंत्री- आठवले

-आता कमाल झाली या प्रणिती शिंदेंची!