बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बापरे! गेल्या दोन महिन्यात तब्बल 35 वेळा वाढले पेट्रोलचे दर

नवी दिल्ली | अलिकडे काही वर्षांमध्ये पेट्रोलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. पेट्रोलच्या वाढत्या भावामुळे वाहन चालवणे सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरचं झालं आहे. यामुळे सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड संताप पाहायला मिळत आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल 100 रुपये प्रति लीटर पार पोहोचलं आहे.

अशातच आता देशातील इतर राज्यांबरोबर देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीमध्ये देखील पेट्रोल शंभर रुपये प्रति लिटरच्या जवळपास पोहोचलं आहे. आज सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांच्या अधिसूचनेनुसार पेट्रोलच्या किंमतीत प्रति लिटरमागे 35 पैशांची वाढ करण्यात आली आहे.

या वाढीनंतर दिल्लीत पेट्रोल 99.86 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. 4 मे पासून पेट्रोलच्या दरात तब्बल 35 वेळा वाढ झाली आहे. तसेच दिल्लीमध्ये आज डिझेलचे भाव 89.36 रुपये प्रति लिटर आहेत. डिझेलच्या किंमतीत आज काहीही वाढ झाली नाही.

दरम्यान, पेट्रोल डिझेलचे वाढते दर नागरिकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. सध्याचे केंद्र सरकार पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दराचे खापर पूर्वीच्या सरकारवर फोडत आहे. इंधनाच्या वाढत्या भावावरुन सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षामध्ये आरोप प्रत्यारोपाची खेळी चालू आहे. मात्र, सामान्य नागरीकच यामध्ये चेपला जात आहे.

थोडक्यात बातम्या –

दिलासादायक! मुंबई कोरोनामुक्तीच्या वाटेवर; आजची रुग्णसंख्या आली 500 च्या खाली

अबब..! चांदीच्या दरात तब्बल 1200 रुपयांची वाढ; वाचा सोन्या-चांदीचे ताजे दर

पुण्याची कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल, वाचा पुण्याची आजची आकडेवारी!

“संघाची सकारात्मक प्रतिमा निर्माण झालेली पाहून या टोळीला मोठा धक्का बसला आहे”

पुढील महिन्यात येऊ शकते कोरोनाची तिसरी लाट, एसबीआयच्या अहवालाने चिंता वाढली!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More