बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यातील आणखी ‘एका’ जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश

गडचिरोली |  गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या कमी होताना दिसत होती. मात्र दोन-तीन दिवसांपासून आकडेवारीमध्ये वाढ दिसून येत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेबाबतही तज्ज्ञांनी सांगितलं आहे. अशातच राज्याच्या आकडेवारीमध्ये वाढ होत असल्याचं दिसून आल्यावर गडचिरोली जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.

गडचिरोलीमध्ये 29 ऑगस्टपासून 12 सप्टेंबरपर्यंत जमावबंदीचे आदेश जारी  करण्यात आले आहेत. गडचिरोली जिल्हा प्रशासनाने लग्न समारंभ, मिरवणूक, सभा, यात्रा आणि उत्सवांवर निर्बंध लावले आहेत.  त्यासोबतच नागरिकांनी आपल्यासोबत शारीरिक इजा करताना वापरण्यात येणारी कोणतीही वस्तु सोबत ठेवता येणार नाही.

पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकं सार्वजनिक रस्त्यावर किंवा ठिकाणी 29 ते 12 सप्टेंबरपर्यंत एकत्र येणार नाहीत. त्यासोबतच कोणत्याही कार्यक्रमाचं आयोजन करता येणार नाही. अशा सूचना प्रशासनाने जिल्ह्यातील नागरिकांना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये याआधी जमावबंदी लावण्यात आली आहे. राज्यातील महत्त्वाची शहरे असलेल्या पुणे आणि मुंबई शहरांमधील कोरोना रूग्णांच्या आकडेवारीमध्ये वाढ होत आहे.

थोडक्यात बातम्या- 

पॅराऑलिम्पिकमध्ये भाविनाची ऐतिहासिक कामगिरी; भारताचं पदक निश्चित

‘…तर मला मान्य असेल’; सेना-भाजप युतीबाबत नारायण राणेंचं मोठं वक्तव्य!

‘आम्ही सुद्धा संयमानं बाॅम्ब टाकणार’; चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला इशारा

“छगन भुजबळ, वडेट्टीवार, मुंडेंसारखे मंत्री तोंडाला डिंक लावल्यासारखे गप्प

….म्हणून पंचांनी हटवली रिषभ पंतच्या ग्लोव्हजवरची पट्टी; पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More