अहमदनगर | ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा आणि युवा नेते प्रशांत गडाख यांच्या पत्नी गौरी गडाख यांचं राहत्या घरी निधन झालं आहे. गौरी प्रशांत गडाख यांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे.
गौरी गडाख यांच्या आत्महत्येचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाहीये. गौरी यांच्या मृत्यूची बातमी कळताच तोफखाना पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी रवाना झालेत.
गौरी गडाख यांच्या आत्महत्येमुळे नगर शहरात एकच खळबळ उडाली आहे. गौरी गडाख राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या भावजयी होत्या.
गौरी गडाख थेट राजकारणात सक्रीय नव्हत्या. मात्र पती प्रशांत यांनी स्थापन केलेल्या यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांचा सामाजिक कामात हातभार होता. यासंदर्भात पोलीस तपास करतायत.
महत्वाच्या बातम्या-
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेमुळे कोरोना संसर्ग रोखण्यात यश- उद्धव ठाकरे
“वेब सीरिजच्या नावाखाली चौकट मोडू नका, अन्यथा…”
चंद्रकांत पाटलांनी घेतली राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची भेट!
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य खबरादारी घेऊन दिवाळीनंतर शाळा सुरु करा- उद्धव ठाकरे
“बाहेर येताच अर्णब 100 टक्के भाजपचा विरोध करणार”