Gauri Kulkarni | अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांचा विवाहसोहळा येत्या 12 जुलै रोजी होणार आहे. त्यांच्या लग्नाआधीच्या समारंभांना सुरुवात झाली असून मागच्या आठवड्यात मामेरू कार्यक्रम झाल्यानंतर शुक्रवारी संगीत सोहळा झाला. या संगीत सोहळ्यात बॉलिवुडमधील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती.
याच संगीत सोहळ्यात हॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक जस्टिन बिबरने परफॉर्मन्स दिला. या परफॉर्मन्ससाठी त्याने जवळपास 83 कोटी रुपये घेतले असल्याची माहिती आहे. अंबानी या लग्नसोहळ्यात पाण्यासारखा पैसा खर्च करताना दिसत आहेत. (Gauri Kulkarni)
गौरी कुलकर्णीची पोस्ट चर्चेत
दुसरीकडे, जिओने मोबाईल रिचार्जच्या किमती वाढवल्या आहेत. अनेक क्रिएटर्सनी यावर मीम्स देखील बनवले आहेत. सोशल मीडियावर हा मुद्दा खूपच गाजत आहे. अशात एका प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीने देखील यावर पोस्ट केली आहे.तिची ही पोस्ट आता सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
ही मराठी अभिनेत्री दुसरी-तिसरी कुणी नसून ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली गौरी कुलकर्णी (Gauri Kulkarni) आहे. तिने सोशल मीडयावर मजेशीर पोस्ट शेअर करत सर्वांचं लक्ष वेधलंय.
रिलायन्स जिओचे वाढवले रिचार्जचे दर
“29 रुपयांचं रिचार्ज केल्याचे पैसे जस्टिन बिबरच्या खिशात जाताना… अजून तुम्हाला याची जाणीव झाली नसेल पण, आम्हाला सगळं कळतं”, अशी पोस्ट गौरीने (Gauri Kulkarni) इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. तिच्या या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. यावर आता अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.
दरम्यान, रिलायन्स जिओचे नवीन दर हे 3 जुलैपासून लागू झाले आहेत. या अंतर्गत, कंपनीने प्रीपेड आणि पोस्टपेड योजनांच्या किमती मासिक, 3 महिन्यांच्या आणि वार्षिक योजनांसाठी 12% ते 27% पर्यंत वाढवल्या आहेत.
News Title – Gauri Kulkarni post in discussion
महत्वाच्या बातम्या-
मुंबईच्या पावसाचा मंत्र्यांनाही फटका; ‘या’ नेत्यांनी रेल्वे रूळावरून केला चालत प्रवास
“..तेव्हा तुमचे बाप-दादा इंग्रजांचे तळवे चाटत होते”; जावेद अख्तर भडकले
पुण्यात झिका व्हायरसने घातलयं थैमान; आढळले ‘इतके’ रुग्ण
मुंबईत पावसाचं थैमान! ‘या’ भागांना बसला सर्वाधिक फटका, शाळा-महाविद्यालयातही पाणीच पाणी