बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गौतम अदानी जगातील तिसऱ्या क्रमांकाचे अतिश्रीमंत; पाहा किती आहे संपत्ती?

नवी दिल्ली | गौतम अदानी (Gautam Adani) हे भारतातील श्रीमंतांपैकी एक आहेत. आता त्यांच्या जगातील सर्वाधीक श्रीमंत व्यक्तींमध्ये सामावेश झाला आहे. अदानींनी लुई व्हिटॉनचे अध्यक्ष, सीईओ बर्नार्ड अर्नाल्ट यांना मागे टाकून ब्लूमबर्ग अब्जाधिशांच्या यादीत पहिल्या 3 मध्ये प्रवेश केला आहे.

या ठिकाणी आपले स्थान निश्चित करुन हा मान मिळविणारे अदानी हे आशिया खंडातील पहिले व्यावसायीक ठरले आहेत. पहिल्या क्रमांकावर एलोन मस्क (251 अब्ज डॉलर्स), दुसऱ्या क्रमांकावर जेफ बेझोस (153 अब्ज डॉलर्स) आणि तिसऱ्या क्रमांकावर गौतम अदानी (137 अब्ज डॉलर्स) आहेत.

मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांना अदानींनी मागे टाकले आहे. ते 113 अब्ज डॉलर्ससह जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. गौतम अदानी यांनी गेल्या दोन वर्षात ही प्रगती केली आहे.

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More