भारताला 2 विश्वचषक जिंकून देणाऱ्या योद्ध्याची क्रिकेटमधून निवृत्ती

नवी दिल्ली | भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर आणि 2007 आणि 2011 सालच्या विश्वचषकात भारताच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या गौतम गंभीरने निवृत्ती घेतली आहे.

सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निृत्त होण्याचा निर्णय त्याने घेतला आहे. अगदी आयपीएलमध्ये सुद्धा खेळणार नाही, असं त्यानं स्पष्ट केलं आहे.

गेल्या 2 वर्षांपासून गौतम गंभीर भारतीय संघातून बाहेर होता. तसेच त्याला आयपीएलमध्ये देखील उल्लेखनीय कामगिरी करता आली नव्हती. 

गौतम गंभीरनं 58 कसोटी, 147 एकदिवसीय आणि 37 टी-20 सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. 2007 आणि 2011 च्या फायनलमध्ये त्याने सर्वाधिक धावा केल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या-

-“मुज्जफरनगर आणि कैराना प्रमाणे ‘बुलंदशहर’ घडवलं जात आहे का?”

-महाराष्ट्राची सत्ता राज ठाकरेंकडे द्या; ते महाराष्ट्राची अस्मिता जपतील!

-सरकारवर टीका करण्यासाठी मला तुमच्या व्यासपीठाची गरज नाही!

-विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या वडिलांचं निधन

-सर्जिकल स्ट्राईकच्या वेळी काँग्रेसला शाेकसभा सुरु आहे असं वाटत होतं- नरेंद्र मोदी