बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नवज्योतसिंग सिद्धू यांनी आधी स्वत:च्या मुलांना सीमेवर पाठवावे, मग….

नवी दिल्ली |  पंजाबमधील काँग्रेसचे प्रमुख नवज्योतसिंग सिद्धू यांनी शनिवारी पाकिस्तानमधील करतारपूर साहिब गुरूद्वाराला भेट दिली. यावेळी त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना मोठे बंधू असे संबोधले. यावर भाजप खासदार गौतम गंभीर यांनी संताप व्यक्त केला आहे.

नवज्योतसिंग सिद्धू यांनी असं वक्तव्य करण्यापूर्वी स्वत:च्या मुलांना सीमेवर पाठवावं, अशा शब्दांत गौतम गंभीर यांनी नवज्योतसिंग सिद्धू यांना टोला लगावला आहे. याबद्दल त्यांनी ट्विट देखील केलं आहे.

पाकिस्तानच्या हद्दित प्रवेश केल्यानंतर करतारपूर कॉरिडॉर प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिटचे सीईओ मोहम्मद लतीफ यांनी नवज्योतसिंग सिद्धू यांचे स्वागत केले. यानंतर बोलताना त्यांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्या वतीने सिद्धू यांच्या शिष्टमंडळाचे अभिनंदन केले. यावर प्रतिक्रिया देताना सिद्धूंनी इम्रान खान यांचा मोठा भाऊ असा उल्लेख करत त्यांचे कौतुकही केले.

भाजप खासदार गौतम गंभीर यांनी यावर ट्विटरद्वारे संताप व्यक्त केला आहे. भारत 70 वर्षांपासून पाकिस्तान पुरस्कृत दहशवादाशी लढा देत आहे आणि अशा दहशतवादी देशाच्या पंतप्रधानांना सिद्धू आपला मोठा भाऊ म्हणत आहेत ही गोष्ट खूप लज्जास्पद आहे, असे गौतम गंभीर म्हणाले. आधी तुमच्या मुलाला किंवा मुलीला सीमेवर पाठवा आणि मग दहशतवादी देशाच्या प्रमुखाला तुमचा मोठा भाऊ म्हणा, अशा आशयाचं ट्विट गौतम गंभीर यांनी केलं आहे.

थोडक्यात बातम्या

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात पुन्हा संचारबंदीचे आदेश

‘ते’ चोख काम नवाब मलिकांनी केले आणि महाराष्ट्रावर उपकारच झाले

’75 वर्षात जितकी प्रगती करायला हवी होती तितकी…’, मोहन भागवतांनी केलं मोठं विधान

“राज्यातील वातावरण भाजपकडून गढुळ केलं जात आहे”

किरीट सोमय्या आज दिल्ली दौऱ्यावर, करणार ‘या’ नेत्यांच्या घोटाळ्याची चौकशी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More