देश

गंभीरने समाजापुढे ठेवला एक नवा आदर्श, लैंगिक काम करणाऱ्या महिलांच्या 25 मुलींची जबाबदारी घेणार!

नवी दिल्ली | संपूर्ण जगात कोरोनाने धुमाकुळ घातलेला आहे. कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आणि हाताला काम नाही. त्यातच समाजात नेहमी दुर्लक्षित असलेला वर्ग म्हणजे लैंगिक काम करणारे. त्यांच्याकडे सहसा कुणीच लक्ष देत नाही. पण भारताचा माजी सलामीवीर आणि भाजप खासदार गौतम गंभीर याने दिल्लीतील लैंगिक काम करणाऱ्या मुलींचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचचले आहे.

दिल्लीतील जीबी रस्त्यावरील भागात लैंगिक काम करणाऱ्या महिलांच्या २५ मुलींचे पुढील सर्व शिक्षण, त्यांचे आरोग्य आणि त्यांच्या जीवनाशी निगडित असलेल्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली जाणार आहे. गौतम आणि त्याच्या सहकाऱ्यांनी या संस्थेला ‘पंख’ हे नाव दिले असून शुक्रवारी या कामाला प्रारंभ करणार आहे.

यासाठी १० मुलींची आधीच निवड झालेली आहे आणि अन्य १५ मुलींचा शोध सुरू आहे. प्रत्येकाला चांगलं आयुष्य जगण्याचा हक्क आहे, याच उद्देशाने आम्ही याची सुरवात केली आहे, असं त्याने सांगितले. निवडलेल्या १० मुलींचे शिक्षण सरकारी शाळेत होणार असून शाळेसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींचा खर्च आमची संस्था उचलणार आहे. तसेच त्यांचे समुपदेशन देखील केलं जाणार आहे, म्हणजेच ते स्वतःला या समाजाचा एक घटक मानतील आणि ते सक्षमपणे आपलं जीवन जगू शकतील.

गंभीरने सांगितले की, शुक्रवारी माझ्या आजीचा जन्मदिवस आहे. त्यांच्याच आशीर्वादाने आम्ही या कार्याला सुरवात करत आहोत आणि या कामाचे सर्व श्रेय त्यांनाच जातं. त्यांची संस्था देशासाठी बलिदान दिलेल्या २०० हुतात्मांच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

निष्ठावंतांच्या निष्ठा कुचकामी!; नुकतंच राष्ट्रवादीत आलेल्या शिवव्याख्यात्यास ‘विद्यार्थी’चं प्रदेशाध्यक्षपद?

…तर २५ हजार रुपये दंड आकारु; रस्त्यावर उतरुन तुकाराम मुंडेंची नियम तोडणारांना ताकीद

वडिलांचं ‘हे’ वाक्य जिव्हारी लागलं, म्हणून 15 वर्षीय तरूणीनं घेतला गळफास

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या