टीम इंडियाला मिळाला नवा हेड कोच; ‘या’ माजी खेळाडूवर टाकली संघाची जबाबदारी

Cricket l भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह यांनी गौतम गंभीरची भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केल्याची घोषणा केली आहे. गौतम गंभीर टीम इंडियाचा इतिहासातील 25 वा मुख्य प्रशिक्षक बनणार आहे. राहुल द्रविडने T20 विश्वचषक 2024 नंतर मुख्य प्रशिक्षकपद सोडले आहे. आता जुलैच्या अखेरीस सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत गंभीर भारतीय संघात नवीन प्रशिक्षक म्हणून सामील होणार आहे. सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (NCA) संचालक व्हीव्हीएस लक्ष्मण हे झिम्बाब्वे दौऱ्यावर अंतरिम मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावत आहेत.

कार्यकाळ किती काळ असेल? :

2024 टी-20 विश्वचषक संपल्यानंतर राहुल द्रविडने टीम इंडियाच मुख्य प्रशिक्षक पद सोडल आहे. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची पहिली मालिका 27 जुलैपासून श्रीलंकेविरुद्ध सुरू होणार आहे. या महिन्याच्या शेवटी टीम इंडिया श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाईल, जिथे दोन्ही संघांमध्ये 3 टी-20 आणि 3 एकदिवसीय सामने खेळवले जातील.

गंभीरचा कार्यकाळ 31 डिसेंबर 2027 पर्यंत चालेल आणि या कालावधीत अनेक आयसीसी स्पर्धाही होणार आहेत. गंभीरसमोर पहिले आव्हान पाकिस्तानमध्ये होणारी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 असेल, त्यानंतर भारताला 2025 मध्ये होणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या मोठ्या आशा आहेत.

Cricket l जय शाहने सोशल मीडियावर पोस्ट करून दिली माहिती :

जय शाहने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टमध्ये गंभीरच्या नावाची घोषणा केली आणि म्हटले की आधुनिक क्रिकेटमध्ये बरेच बदल होत आहेत आणि गंभीरने हे बदल जवळून पाहिले आहेत. गंभीरच्या मेहनतीचे आणि वेगवेगळ्या भूमिकांमध्ये मिळालेल्या यशाचे कौतुक करताना शाह यांनी विश्वास व्यक्त केला की, भारतीय क्रिकेटला पुढे नेण्यासाठी गंभीर हे आदर्श व्यक्तिमत्त्व आहे.

2026 मधील T20 विश्वचषक आणि 2027 एकदिवसीय विश्वचषक ही गंभीरच्या कार्यकाळातील भारतीय संघाची शेवटची ICC स्पर्धा असेल. अहवालांवर विश्वास ठेवला तर गौतम गंभीर प्रशिक्षक बनताच अनेक मोठे निर्णय घेऊ शकतो.

News Title – Gautam Gambhir Indian Cricket Team Head Coach

महत्त्वाच्या बातम्या-

टी-20 वर्ल्डकप विजेत्या संघातील ‘या’ खेळाडूला मिळणार घर आणि सरकारी नोकरी!

स्क्रीनसमोर जास्त वेळ बसल्याने डोळ्यांची जळजळ होतेय?, ‘या’ उपयांनी मिळेल आराम

“तात्यांचं शेवटचं स्टेशन हे मातोश्री..”; वसंत मोरेंच्या पक्ष प्रवेशावर संजय राऊतांचं वक्तव्य

सोन्याने घेतली पुन्हा भरारी, काय आहेत आजचे दर?

वरळी हिट अँड रन प्रकरणी मोठी अपडेट समोर; मुख्य आरोपीला पोलिसांनी..