बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गौतम गंभीर म्हणतो,”हार्दिक पांड्याने गोलंदाजी केली नाही तर…”

मुंबई | भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने दुखापतीमुळे आयपीएलमध्ये गोलंदाजी केली नाही. आयपीएलच्या हंगामात पांड्याची बॅट देखील तळपली नाही. तरी देखील टी-20 विश्वचषकमध्ये हार्दिक पांड्याची निवड करण्यात आली आहे. तो गोलंदाजी करू शकणार की नाही, याबाबत काहीही माहिती समोर आलेली नाही. याच पार्श्वभूमीवर भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने महत्वाचं वक्तव्य केलं आहे.

आयपीएलमध्ये पांड्याने गोलंदाजी न केल्यामुळे निवड समितीने फिरकी गोलंदाज अक्षर पटेलऐवजी अष्टपैलू खेळाडू शार्दूल ठाकूरला संघात घेतलं आहे. सगळ्याच चाहत्यांना आशा आहे की, विश्वचषकमध्ये हार्दिक पांड्याने गोलंदाजी करावी, तसे केल्यामुळे संघाला चांगला समतोल मिळू शकेल. जर हार्दिक पांड्याने गोलंदाजी केली नाही तर त्याला माझ्या संघात ठेवणार नाही, असं मत गौतम गंभीरने व्यक्त केलं आहे.

गौतम गंभीर 2007 आणि 2011 च्या विश्वचषक स्पर्धेत महत्वाचा खेळाडू होता. अंतिम सामन्यात केलेल्या महत्वपूर्ण खेळीमुळे गंभीरने संघाला विजय मिळवून दिला होता. के.एल. राहुलने सलामीची जागा पक्की केली आहे. आपल्या सर्वांना हार्दिकला एक यशस्वी अष्टपैलू म्हणून बघायचे आहे, परंतु त्याने आतापर्यंत तसे काहीही केले नाही, असंही गंभीर म्हणाला.

दरम्यान, भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा म्हणाला होता, की विश्वचषक स्पर्धेत हार्दिक पांड्या गोलंदाजी करू शकतो. मात्र हार्दिक पांड्याबद्दल अजूनही चिंता व्यक्त केली जात आहे.  भारताचा पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध 24 ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यामुळे शार्दूल ठाकूरच्या उपस्थित हार्दिक पांड्याला जागा मिळणार की नाही, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

थोडक्यात बातम्या-

अन् तो क्षण जेव्हा इतिहास घडला! आयर्लंडला धक्का देत नामिबियाचा सुपर-12 मध्ये प्रवेश

अमरिंदर सिंग यांना ‘पाकिस्तानी मैत्री’ भोवणार?; पंजाब सरकारकडून चौकशीचे आदेश

“मी ठाकरे सरकार आणि नवाब मलिकांना इशारा देतोय की…”

ठरलं तर! अचानक रद्द झालेला ‘तो’ निर्णायक कसोटी सामना पुढच्या वर्षी होणार

‘गिरीश महाजन यांना पैशांचा घमंड असल्यानं…’; रोहित पवारांची घणाघाती टीका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More