Top News खेळ

दिनेश कार्तिकच्या ‘त्या’ मोठ्या निर्णयावर गौतम गंभीर नाराज, म्हणाला…

नवी दिल्ली | दिनेश कार्तिकने आयपीएल स्पर्धेच्या मध्यावर कोलकाता नाईट रायडर्सचं कर्णधारपदं सोडलं. या मुद्द्यावरून कोलकाता नाईट रायडर्सचा माजी कर्णधार गौतम गंभीर याने कार्तिकच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

गौतम गंभीर म्हणाला की, “कर्णधार पद सोडणं हे फक्त मानसिकता दाखवतं. मुळात दिनेश कार्तिकला केवळ फलंदाजीवर लक्ष केंद्रित करायचं होतं. मात्र त्याने फार काही साध्य होणार नाहीये.

यावेळी गंभीरने स्वतःचं देखील उदाहरण दिलं. “तो म्हणाला, मी स्वत: 2014 साली या परिस्थितीचा सामना केला होतो. त्यावेळी सलग तीन सामन्यांमध्ये मी शून्यावर बाद झालो होतो. पण नंतर मी पुनरागमन केलं आणि त्यावेळी मला कर्णधारपदानेच फॉर्ममध्ये येण्यास मदत केली होती.”

फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी तुम्ही जबाबदारी घेणे महत्त्वाचे असतं, असा सल्लाही गंभीरने कार्तिकला दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

ठाकरे सरकार कोसळेल अशा पैजा लागल्या होत्या, पण…- संजय राऊत

“बाळासाहेब ठाकरे असताना राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू मुंबईत होता, पण आता… “

“…तर ही धर्मांधता म्हणजे वैचारिक दिवाळखोरीच म्हणावी लागेल”

दिलासादायक! अकरावीच्या विद्यार्थ्यांचे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून ऑनलाईन वर्ग

प्रसंगी कर्ज काढू, पण दिवाळीपूर्वी वेतन देणारच; अनिल परब

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या