बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तुझं नशिब नाहीतर…”, गंभीरनं कॅप्टनवरच टीका केल्यानं क्रिकेट जगतात मोठी खळबळ

नवी दिल्ली | भारतीय क्रिकेट सध्या विश्वचषकातील मानहानिकारक पराभवातून सावरताना दिसत आहे. सध्या न्यूझीलंड संघ भारतीय दौऱ्यावर आहे. टी ट्वेंटी मालिकेत भारतानं न्यूझीलंडचा पराभव केला असून सध्या भारत दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. (New Zealand India Test Match) कसोटी मालिकेतील कर्णधारपदावरून आता रामायण सुरू झालं आहे. (Gautam Gambhir questioned on ajinkya rahane)

भारतीय कसोटी संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली सध्या सुट्टीवर असल्यानं त्याच्याजागी कसोटी संघाची कमान अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. अजिंक्य रहाणेला (Captain ajinkya rahane) कसोटीचा कर्णधार केल्याची बाब काही माजी दिग्गज खेळाडूंना आवडली नसल्याचं दिसत आहे. भारताचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरनं अजिंक्य रहाणेच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

रहाणेचं नशीब चांगलं आहे म्हणून तो अजूनही संघात आहे, असा टोला गौतम गंभीरनं रहाणेला लगावला आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत रहाणेला आपल्या लौकिकाला साजेसा खेळ दाखवता आला नव्हता. परिणामी रहाणेच्या खेळावर सर्वबाजूंनी टीका होत होती. अशातच आता गंभीरच्या टीकेनं भारतीय संघ व्यवस्थापन अडचणीत आलं आहे.

दरम्यान, सध्या भारतीय कसोटी संघात विराट कोहली सोडून अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या दिग्गज खेळाडूंना आपल्या लौकिकाला साजेसा खेळ दाखवता येत नाहीये. विराट कोहलीनं त्याच्या खांद्यावरील टी ट्वेंटी कर्णधारपदाचा भार रोहित शर्मावर सोपवला आहे. अशातच आता कसोटीचा पुढचा नियमीत कर्णधार कोण हा प्रश्न आहे.

थोडक्यात बातम्या 

मालिका सुरु होण्याआधीच भारताला मोठा धक्का, ‘हा’ स्टार खेळाडू खेळणार नाही!

रात्रीस खेळ चाले! फडणवीस आणि काँग्रेस आमदाराच्या गुप्तभेटीच्या चर्चेनं मोठी खळबळ

सावधान, नव्या फंगसमुळे 2 डॉक्टरांचा मृत्यू, आधीच्या तुलनेत मृत्यूचा धोका जास्त

शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी मिळणार पैसे

तिकडं राष्ट्रवादीचं कार्यालय फुटलं, इकडं ‘ओ शेठ’ गाण्यावर तुफान डान्स

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More