प्रशिक्षक होताच गौतम गंभीरची विराट आणि रोहितला तंबी, म्हणाला…

Gautam Gambhir | टीम इंडियाने नुकत्याच झालेल्या टी20 विश्वचषकात विजय मिळवला. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि रन मशीन विराट कोहलीने टी20 क्रिकेट फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. तसेच संघाचा माजी प्रशिक्षक राहुल द्रविडने देखील निवृत्ती घेतली. यानंतर आता टीम इंडियाचा नवनिर्वाचित प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरची (Gautam Gambhir) निवृत्ती झाली आहे. यामुळे आता गौतम गंभीरने रोहित आणि विराटला तंबी दिली आहे.

टी20 विश्वचषक खेळल्यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांनी केलेला आराम हा पुष्कळ असल्याचा दावा गौतम गंभीरने (Gautam Gambhir) केला. गौतम गंभीरने (Gautam Gambhir) टीम इंडियातील सिनियर खेळाडूंना आगामी क्रिकेटच्या मालिका खेळण्याबाबत सक्त तंबी देखील दिली. तसेच गंभीरने संघाची निवड करणाऱ्यांना देखील याबाबत सांगितलं आहे.

“वरीष्ठ खेळाडूंना वगळू नये”

आगामी टी20 तीन सामने आणि वनडेचे तीन सामने श्रीलंका विरूद्ध खेळवण्यात येणार आहे. मात्र विराट, रोहित आणि जसप्रीत बुमराह या खेळाडूंना विश्रांती देण्यात यावी असा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता प्रशिक्षक गंभीरने टी20 विश्वचषकानंतर आगामी सामन्यांमध्ये वरीष्ठ खेळाडूंना वगळू नये असं गंभीर म्हणाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

श्रीलंकेचा टी20 सामना हा 2 ऑगस्ट रोजी सुरू होणार असून 7 ऑगस्ट रोजी संपणार आहे. तर बांग्लादेशविरुद्धची मालिका 19 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. यामुळे दोन्हींमध्ये बरंच अंतर राहतंय. त्यामुळे खेळाडूंना पुन्हा एकदा आराम मिळणार असून विराट, रोहित आणि जसप्रीत बुमराहला गौतम गंभीर (Gautam Gambhir) म्हणाला आहे. यामुळे आता श्रीलंकाविरूद्ध वरीष्ठ खेळाडू खेळतील की नाही?, असा सवाल उपस्थित होताना दिसत आहे.

टी20 विश्वचषक नुकताच पार पडला. त्या विश्वचषकात टीम इंडियाने महत्त्वाची भूमिका उचलली आहे. त्यामध्ये गोल्डन षटक टाकणारा गोलंदाज म्हणून हार्दिक पांड्याचं नाव चर्चेत आहे. आगामी श्रीलंकेविरोधातील टी20 सामन्यात पांड्या खेळेल. मात्र वनडे सामन्यांमध्ये तो त्यांच्या वैयक्तिक कारणाने खेळणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

टी 20 आणि वनडे मालिका पांड्या खेळणार?

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत बांग्लादेशविरुद्ध हार्दिक पांड्या शेवटचा वनडे सामना खेळला होता. मात्र त्यानंतर पांड्याने वनडे सामना खेळलेला नाही. दरम्यान पांड्या हा वनडे सामन्यांमध्ये त्याच्या वैयक्तिक कारणाने खेळणार नसल्याचं त्याने बीसीसीआयला सांगितलं आहे. दरम्यान श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली जाईल. दरम्यान टीम इंडिया संघात कोणते खेळाडू खेळतील? कोणाला संधी दिली जाईल? हे पाहणं उत्कंठावर्धक आहे.

News Title – Gautam Gambhir Request To BCCI Selection Committe Rohit, Virat, Jasprit Bumrah Play In Sri Lanka

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! निवडणुकीनंतर पहिल्यांदा सुनेत्रा पवार दिसल्या शरद पवारांच्या मोदीबागेत

बीसीसीआयच्या निर्णयानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची मोठी मागणी!

पंढरपूरला जाणारी बस दरीत कोसळली, मृतांचा आकडा आला समोर

23 वर्षीय तरूणीने संपवलं आपलं जीवन, मरीन ड्राईव्हवरून समुद्रात घेतली उडी

देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेचा ग्राहकांना झटका!